Home जालना प्रियदर्शनी कॉलनी येथे संकटमोचन हनुमान मंदिरात अन्नकूट प्रसाद सोहळा संपन्न अन्नकूट प्रसाद...

प्रियदर्शनी कॉलनी येथे संकटमोचन हनुमान मंदिरात अन्नकूट प्रसाद सोहळा संपन्न अन्नकूट प्रसाद ही केवळ परंपरा नाही, ती भक्तिभाव आणि सामाजिक एकतेचे प्रतीक आहे

114

आशाताई बच्छाव

1002166194.jpg

 

प्रियदर्शनी कॉलनी येथे संकटमोचन हनुमान मंदिरात अन्नकूट प्रसाद सोहळा संपन्न

अन्नकूट प्रसाद ही केवळ परंपरा नाही, ती भक्तिभाव आणि सामाजिक एकतेचे प्रतीक आहे

ही परंपरा पुढील पिढ्यांनी जपली जावी – जिल्हाध्यक्ष, भास्कर आबा दानवे

जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) : जालना शहरातील प्रभाग क्र. १ मधील प्रियदर्शन कॉलनी येथे असलेल्या संकटमोचन हनुमान मंदिरात मागील ३५ वर्षांपासून चालत आलेली अन्नकूट प्रसादाची परंपरा यंदाही भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. स्थानिक नागरिकांच्या स्वयंप्रेरणेने दरवर्षी प्रमाणे या वर्षीही अन्नकूट प्रसाद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी उपस्थित राहून महाआरती केली आणि भक्तांसोबत प्रसादाचा लाभ घेतला.

भास्कर आबा दानवे बोलताना म्हणाले की, “प्रियदर्शनी कॉलनीतील संकटमोचन हनुमान मंदिरात गेली अनेक वर्षे भक्तिभावाने अन्नकूट प्रसादाची परंपरा जपली जाते. ही परंपरा ही केवळ धार्मिक नाही तर सामाजिक एकतेचे प्रतीक आहे. अशी संस्कारमूल्ये पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे आपली जबाबदारी आहे,” असे त्यांनी सांगितले.

त्यांनी यावेळी आयोजक मंडळाचे कौतुक करत ही परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत कायम ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष धनराज काबलिये, कल्याण भदनेकर, प्रभागातील दिलीप शर्मा, अजित मानधनी, कैलास अग्रवाल, पालवे सर, शिवम यादव, किशोर आगलावे यांसह महिलांमध्ये शारदा काबरा, कमल मंत्री, मंगला मानेगावकर, मीना मित्तल, शोभा अग्रवाल आदींची उपस्थिती होती.

अन्नकूट प्रसादासाठी परिसरातील नागरिक, महिला, युवक, बालक यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. संपूर्ण परिसरात “जय हनुमान” च्या घोषणांनी धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

Previous articleबदनापूर मध्ये ध्वजारोहण (मंडप  उभारणी) सोहळा संपन्न.               
Next articleकापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरु करून सीसीआयच्या जाचक अटी रद्द करा – जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.