आशाताई बच्छाव
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धर्मनिरपेक्ष विचारावर ठाम असल्याने सर्व समाज घटक सोबत-जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांचे सुतोवाच.
जालना, दिलीप बोंडे ब्युरो चीफ-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे विकासात्मक व कल्याणकारी तसेच सर्व समाज घटकांना सोबत घेऊन जनसामान्यांसाठी झटणारे नेतृत्व असल्याची जाण राज्यातील जनतेला झाली,म्हणून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा गटचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी व्यक्त केला.
जालना शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटच्या अध्यक्षपदी शेख मेहमूद यांची नियुक्ती झाल्याबद्दल बुधवार रोजी जिल्हा पक्ष कार्यालयात त्यांना नियुक्ती प्रदान कार्यक्रमात श्री चव्हाण हे बोलत होते.यावेळी श्री शेख मेहमूद यांचा शाल,पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.यावेळी अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष शाह आलम खान,मिर्झां अन्वर बेग,एडवोकेट शेखर पाटील,फिरोज सौदागर,महिला काँग्रेसच्या रिंकल तायड,संतोष ढेंगळे,शितलताई बारोटे,विजय सोनवणे,लक्ष्मण हरकळ,शिवराज जाधव,गणेश चांदोळे,शेख शमशुद्दीन,सय्यद आरिफ,आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना श्री चव्हाण म्हणाले की,जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगरपरिषद आणि महानगरपालिका च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस मोठ्या ताकदीने मैदानात उतरणार असून शिव-शाहु फुले व आंबेडकर वादी विचारधारा व धर्मनिरपेक्षता समोर ठेवून मतदार पुढे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महानगरपालिकेत ताकद दाखवू-शेख मेहमूद.
जालन्यातील जनता धर्मनिरपेक्ष विचारांना मानणारी आहे.येत्या निवडणुकीत समाजा-समाजा मध्ये तेढ निर्माण करणाऱ्या धडा शिकवू असं शेख महेमूद यांनी सांगितले.






