आशाताई बच्छाव
अहिल्यानगरमध्ये गुटखा विक्री करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा. अहिल्यानगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे
अहिल्यानगर शहरात अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तोफखाना, कोतवाली, भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत छापे टाकून सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून १७ हजार १३२ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत ताराकपूर परिसरात अल्तमश फयाज सय्यद रा. बेपारी मोहल्ला, सुभेदार गल्ली, झेंडीगेट अहिल्यानगर, भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत समीर अब्दुल बागवान रा. रामचंद्र खुंट, अहिल्यानगर, समीर शाबीर शेख रा. अहिल्यानगर, आतिक उर्फ आकीब मोहमंद शेख रा. भिंगार, कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत मुजाहिद अल्ताफ तांबोळी रा. झेंडीगेट चौक, अहिल्यानगर अल्ताफ पान शॉप, आयुर्वेद कॉर्नर, समीर शाबीर शेख रा. अहिल्यानगर, आतिक मोहमंद शेख रा. भिंगार, यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.