Home उतर महाराष्ट्र धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, ‘

धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, ‘

66

आशाताई बच्छाव

1002012285.jpg

अहिल्यानगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे –धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, ‘रास्ता रोको’नंतर लाठीचार्ज
भावना दुखावल्याने दोन गटांत किरकोळ वाद झाले. कोतवाली पोलिसांकडून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशातच संतप्त गटाने आज ता. २९ सकाळी ११ वाजता अचानक छत्रपती संभाजीनगर-पुणे महामार्गावर कोठला येथे रास्ता रोको केला. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती.
मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज केला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. ही घटना सोमवारी (ता. २९) सकाळी घडली. यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोलीस उपअधीक्षक दिलीप टिपरसे, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी, तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते, एमआयडीसीएचे माणिक चौधरी, तसेच क्यूआरटी, राज्य राखीव पोलीस दल यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
अहिल्यानगर शहरातील माळीवाडा भागातील बारातोटी कारंजा येथे धर्मगुरुंबद्दल रस्त्यावर रांगोळी काढून आक्षेपार्ह कृती केल्याप्रकरणी दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी आंदोलकांना समजावले, मात्र, सोमवारी याचे पडसाद उमटले. विटंबना करणाऱ्या संबंधिताविरुद्ध कारवाई करण्याच्या मागणीसाठी अहिल्यानगर -छत्रपती संभाजीनगर रोडवरील कोठला भागात कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या दिला. मात्र संबंधित तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आंदोलकांनी आता आंदोलन करण्याची गरज नाही, असे पोलीस समजून सांगत होते. दरम्यान छत्रपती संभाजीनगर- अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. वाहतुकीत अडथळा येऊ नये म्हणून पोलीस वारंवार विनंती करत होते. मात्र, आंदोलकांनी आक्रमक पावित्रा घेतला. पोलिसांवर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामुळे काही वेळ गोंधळ आणि तणावाची परिस्थिती निर्माण झाली. त्यानतर पोलिसांनी ३० ते ३५ जणांना ताब्यात घेतले आहे. या दरम्यान, हा तणाव आता शांत झाला असून पोलिसांनी संबंधित युवकाला व आंदोलन करणाऱ्यांची धरपकड सुरु केली आहे. जमावाला पांगवण्यासाठी हा लाठीचार्ज करण्यात आला आला असल्याचे पोलीस प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आले.

Previous articleदेवळा तालुक्याच्या हद्दीत चोरीस गेलेल्या ट्रॅक्टरचा जालना जिल्ह्यातून जप्त . देवळा पोलिसांची दमदार कामगिरी
Next articleअहिल्यानगरमध्ये गुटखा विक्री करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.