आशाताई बच्छाव
उद्योजक घनश्यामदास गोयल यांच्या हस्ते स्त्री दुर्गा जागर मंडळाची आरती
शेतकऱ्यांवरील संकट दूर करण्याची प्रार्थना
जालना (प्रतिनिधी दिलीप बोंडे) :
जालना शहरातील सामाजिक कार्यकर्त्या नंदा पवार यांच्या स्त्री दुर्गा जागर मंडळाची गुरूवारी उद्योजक घनश्यामदास गोयल यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
शिवनगर येथील चांभारकुंड परिसरात नंदा पवार यांनी स्थापलेले या मंडळाचे आयोजन भक्तिभावाने पार पडले. या वेळी गोयल यांनी देवी यल्लमा समोर अतिवृष्टीमुळे शेतमालाचे नुकसान झाले आहे, शेतकरी संकटात आहेत, यापुढे शेतकऱ्यांवरील संकट टळो व त्यांना बरकत मिळो, जनतेचे आरोग्य निरोगी राहो असे साकडे घातले.
यावेळी ढोर समाजाचे जेष्ठ नेते मुरलीधर चांदोडे यांनी गोयल यांचा सत्कार केला. कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या नंदा ताई पवार, गणेश चांदोडे, सुरज यलगंठवार, सचिन क्षिरसागर, गजानन ठोंबरे, कुलदीप चांदोडे, समाधान खाडे, राजकुमार पोळ, गणेश बागडे, सचिन जेवाळ, लक्ष्मण भोरे, आकाश चांदोडे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रम भक्तिभावाने पार पडला आणि उपस्थितांनी देवीस सामूहिक प्रार्थना करून शेतकऱ्यांसाठी कल्याणाची इच्छा व्यक्त केली.