आशाताई बच्छाव
लक्ष्मण हाकेंवर हल्ला करणारे तिघे जेरबंद; पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती अहिल्यानगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंवर हल्ला करणारे तिघे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे. हाके यांच्यावर अहिल्यानगर तालुक्यातील अरणगाव शिवारात हल्ला झाला होता.
लक्ष्मण हाके हे आहे आज (ता. २७) पाथर्डी तालुक्यातील दैत्य नांदूर येथे ओबीसी एल्गार सभेसाठी जात असताना अरणगाव शिवारातील रस्त्यावर लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर तरुणांनी हल्ला केला. हल्ला झाला त्यावेळी लक्ष्मण हाके यांच्यासोबत पोलीस बंदोबस्त होता. या घटनेतील हल्ला करणारे तिघे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या विरुद्ध अहिल्यानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक घार्गे यांनी दिली.