आशाताई बच्छाव
आमदार संतोष रावसाहेब पाटील दानवे हे सेवा पंधरवडा निमित्य वृक्षारोपण करताना व स्वच्छता अभियान राबवताना
गजेंद्र लोखंडे दैनिक प्रतिनिधी भोकरदन
शासनाच्या सेवा पंधरवडा निमित्य सर्व शासकीय कार्यालय निम शासकीय कार्यालयामध्ये तसेच ग्रामीण भागामध्ये शासकीय पंधरवडा म्हणून दुसऱ्या सप्ताहामध्ये बऱ्याच ठिकाणी वृक्षारोपण व स्वच्छता अभियान तसेच इतर शासकीय कार्यालयामध्ये मिळणारी सामान्य नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांबाबत जसे की राशन कार्ड जात प्रमाणपत्र इतर मिळणारे प्रमाणपत्रे या पंधरवडा सेवा मध्ये वाटप करून सामान्य नागरिकांसाठी सेवा मिळावी म्हणून हे सेवा पंधरवाडा अभियान राबवल्या जात आहे आज भोकरदन येथे आमदार संतोष पाटील दानवे यांच्या हस्ते बस स्टॅन्ड या ठिकाणी वृक्षारोपण करून स्वच्छता अभियान मोहीम राबविण्यात आली. यावेळी बोलताना आमदार साहेब म्हणाले की हे अभियान फोटो काढण्यापुरतं मर्यादित न ठेवता भोकरदन शहर नेहमी प्रमाणे स्वच्छता राबवल्या गेली पाहिजे वृक्षारोपण करणे ही आज काळाची गरज आहे बऱ्याच ठिकाणी वृक्ष तोडले जात आहे त्यामुळे आपल्याला ज्या निसर्गाकडून मिळणाऱ्या फ्री सेवा म्हणून आपण ऑक्सीजन सावली फळे इतर बरेचसे प्रमाणात आपण निसर्ग काढून घेत असतो आणि आजच्या घडीला बऱ्याच ठिकाणी वृक्षतोड झालेले आहे झाडांच्या सावल्या दुरावलेले आहे विसावा म्हणून बऱ्याच वेळेस आपण झाडाचा आश्रय घेतो खऱ्या अर्थानं वृक्षाची आठवण माणसाला उन्हाळ्यामध्ये येते उन्हाळ्यामध्ये तापमान वाढते व माणूस प्रवास करत असताना किंवा चालत असताना उन्हाचे चटके जाणवतात चटका बसतात त्यावेळेस आपण सावलीचा आधार शोधत असतो त्या वेळेला खरं आठवण या वृक्षाची होते म्हणून सर्वांनी एक झाड तरी लावायलाच पाहिजे तहान लागली की विहीर खोदावी या म्हणीप्रमाणे लोक आज आपलं जीवन जगत आहे यावेळी नगरपालिकेचे सिओ श्री तायडे साहेब उपविभागीय पोलीस श्री कुटेकर साहेब व त्यांचे कर्मचारी दीपक मोरे भाजपा शहराध्यक्ष मुकेश भाऊ चिने डॉक्टर सावंत मॅडम व भारतीय जनता पार्टीच्या लक्ष्मी नगर मधील महिला मंडळ व कार्यकर्ते माझी नगरसेवक रणवीर भाऊ देशमुख सचिन वराडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मदन तुपे तालुका अध्यक्ष सपाटे तसेच इतर नागरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.