आशाताई बच्छाव
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकांवरील हल्ल्याचा मोखाड्यात निषेध
पालघर:सौरभ कामडी
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या काही पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मोखाडा तालुका पत्रकार संघाकडून निषेध व्यक्त केला आहे.पत्रकार समाजातील व लोकशाही व्यवस्थेचा चौथा स्तंभ असतानाही पत्रकारांवरील हल्ले ही निंदनीय बाब आहे.या घटनेमुळे पत्रकार संघटेत संतापाची लाट उसळली आहे, त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर हल्ला केला होता याच्या निषेधार्थ मोखाडा तालुका पत्रकार संघाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला तसेच पत्रकारांवरील दिवसेंदिवस वाढत्या हल्ल्यावर शासनाने पत्रकार संरक्षण कायदा अधिक मजबूत करत हल्लेखोर यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.मोखाडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले यांच्या कडे त्या हल्लेखोर इसमांवर कठोर कारवाई करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष वामन दिघा,पत्रकार हनीफ शेख,पत्रकार रवींद्र साळवे,पत्रकार मकरंद बात्रे,पत्रकार भाऊ वैजल,पत्रकार जयराम वाघ,पत्रकार सद्दाम शेख,पत्रकार तेजस रोकडे आदी उपस्थित होते.