आशाताई बच्छाव
शासकीय रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करा अन्यथा तीव्र आंदोलन सुभाष त्रिभुवन
श्रीरामपूर (प्रतिनिधी दिपक कदम) – श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव रोड येथे शासनाने भव्य आणि सुसज्ज शासकीय उपजिल्हा रुग्णालय उभारले आहे. या रुग्णालयात दररोज अनेक गोरगरीब महिला प्रस्तुतीसाठी येतात. मात्र, रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, एम.डी. मेडिसिन तज्ञ डॉक्टरांची अजूनही नेमणूक झालेली नाही. त्यामुळे प्रस्तुती साठी आलेल्या महिलांना लोणी किंवा जिल्हा रुग्णालय या ठिकाणी पाठवले जाते त्याचप्रमाणे, रुग्णालयात अत्यावश्यक व्हेंटिलेटरचीही कमतरता असल्याने गंभीर परिस्थितीत रुग्णांचे जीव धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दादा त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली रिपाई शिवसेना वंचिता आघाडी मर्चंट असोसिएशन राष्ट्रीय जनसेवा पार्टी जिल्हा रुग्णालय येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ कल्पेश गगड यांना मागण्याचे निवेदन दिले त्यावेळी कार्यालयीन अधीक्षक डॉ.दीपक पाळंदे डॉ. मुकुंद शिंदे आदी हजर होते त्यावेळी
सुभाष त्रिभुवन म्हणाले, “शासनाने भव्य इमारत व आधुनिक मशिनरी तर उपलब्ध करून दिली आहे, पण त्यांचा उपयोग होण्यासाठी आवश्यक तज्ञ डॉक्टरांची तातडीने नेमणूक झाली पाहिजे. या संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांना भेटून सविस्तर निवेदन देण्यात येणार आहे या आंदोलनाची शासनाने गंभीर दखल घेऊन तज्ञ डॉक्टरांची त्वरित नेमणूक करून गोरगरीब रुग्णांची होत असलेली अडचण दूर करावी अन्यथा आम्हाला शासनाविरुद्ध यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशाराही यावेळी त्रिभुवन यांनी दिला.
या आंदोलनात मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष संतोष डहाळे, राष्ट्रीय जनसेवा पार्टीचे जिल्हाध्यक्ष तेजस गायकवाड भीमशक्तीचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास जाधव मिशन, वात्सल्यचे बाळासाहेब जपे रिपाईचे युवक शहराध्यक्ष विशाल सुरडकर अमोल मिसाळ गायकवाड, वंचित बहुजन आघाडीच्या दर्शनाताई काळे, वंदना गायकवाड, शिवसेनेच्या सारिका ताई व्हावळ, सविताताई वाडीले, किशोर अभंग, राजेश व्हावळ, संभाजी देवकर, शिवाजी लाहोर, संतोष भालेराव, सुनील फुलारे तसेच प्रसन्न धुमाळ विजया जमधडे मालिनी पाटोळे आदी नर्स सिस्टर उपस्थित होते.