Home जालना अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान – युवा सेनेचे तहसीलदारांना निवेदन

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान – युवा सेनेचे तहसीलदारांना निवेदन

148

आशाताई बच्छाव

1001933893.jpg

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान – युवा सेनेचे तहसीलदारांना निवेदन
जालना -वसंतराव देशमुख
दिनांक ०९/०९/२०२५
याविषयी सविस्तर माहिती अशी की,चिखली तालुक्यात दिनांक १७ व १८ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या अतीवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची प्रभावी नोंद घेण्यासाठी व सर्वेक्षण याद्या ग्रामसभेत जाहीर वाचन करण्यासाठी *युवा सेना वि.प्रमुख शिवाजी शिराळे पाटील यांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.*
युवासेना विभाग प्रमुख यांनी सांगितले की,केंद्रीय मंत्री श्री. प्रतापराव जाधव यांच्या सूचनेनुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून तयार झालेल्या यादीचे ग्रामसभेत वाचन करण्याचे आदेश दिले गेले होते. मात्र, अनेक ठिकाणी या यादीचे वाचन न होण्याची शेतकऱ्यांकडून तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व तलाठी व कृषीसहाय्यक यांना या यादीचे ग्रामसभेत वाचन करण्याचे आदेश देण्यात यावे, तसेच पुढे कोणतीही तक्रार येणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
युवासेनेने निवेदनामध्ये स्पष्ट केले आहे की, मागणी पूर्ण न झाल्यास मोठे जनआंदोलन उभे करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रतीलिपी केंद्रीय आरोग्यमंत्री आणि बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्री. प्रतापराव जाधव यांना पाठवण्यात आली आहे.
निवेदनावर उपजिल्हाप्रमुख शिवाजी बापू देशमुख, शहरप्रमुख विलास घोलप, शिवसेना नेते काकडे साहेब, कुटे सर, अनिल जाधव, समाधान जाधव, अमोल ढोरे, आशुतोष हाडे, दीपक गरड, राम देशमुख, विनोद वानरे, राकेश चोपडा, पवन चिंचोले, राजू गायकवाड, नारायण गरड यांच्यासह अनेक समाजसेवी आणि युवक नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.प्रशासनाने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्याची अपेक्षा या निमित्ताने व्यक्त केली आहे.

Previous articleवसमत मंगळवार बाजारातील व्यापारी व बाजारहाट पावसाने केली मोठी नुकसान
Next articleगाडेगव्हाण जिल्हा परिषद शाळेत गणवेश वाटप
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.