आशाताई बच्छाव
शिक्षक दिन उत्साहात साजरा
कै. दौलतराव पाटील इंग्लिश स्कूल, बेलोरा
वाशिम गोपाल तिवारी ब्युरो चीफ –बेलोरा येथील कै. दौलतराव पाटील इंग्लिश स्कूल येथे 05 सप्टेंबर हा शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी शाळेचे सर्व कामकाज छात्रशिक्षकांनी स्वतः चालविले. सर्वप्रथम भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कार्याची माहिती देण्यात आली. इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारून अध्यापणाचे कार्य करत शिक्षकांचे महत्व जाणून घेतले. याप्रसंगी कु. अनवी करेवार (8वी) या मुलीने मुख्याध्यापक पद स्वीकारले तर कु. दिव्या जाधव (7वी) या मुलीने उपमुख्याध्यापकाची जबाबदारी स्वीकारली. तसेच पर्यवेक्षकाची जबाबदारी वरद मस्के (8वी) यांनी स्वीकारली. या कार्यक्रमाप्रसंगी निवडक छात्रशिक्षकांनी सहभाग घेऊन आपणावर सोपविलेले काम व्यवस्थितपणे पूर्ण केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग व इत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.