आशाताई बच्छाव
लोकसंघर्ष पक्षाच्या नाशिक विभाग प्रमुखपदी राजेंद्र पाटील राऊत यांची निवड
पुणे, सुर्यकांत भोर प्रतिनिधी:- युवा मराठा न्यूजपेपर्स अँन्ड वेब न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत यांची लोकसंघर्ष पक्षाच्या नाशिक विभाग प्रमुखपदी नुकतीच पक्षाचे अध्यक्ष अँड योगेश माकणे यांनी नियुक्तीपत्र देऊन निवड केली आहे.
राजेंद्र पाटील राऊत यांचे सामाजिक चळवळीतील कार्य व्यापक स्वरूपात असून, त्यांनी अन्याय, अत्याचार व भ्रष्टाचार विरोधी प्रखरपणे आवाज उठवून स्वतः ची एक ओळख निर्माण केली आहे.त्यांचा उपयोग निश्चितच लोकसंघर्ष पक्षाला होणार असल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.
तर आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या शिवाय महानगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षाचे उमेदवार निश्चितपणाने उभे करण्यात येतील असे नवनियुक्त नाशिक विभाग प्रमुख राजेंद्र पाटील राऊत यांनी सांगितले.