आशाताई बच्छाव
निफाड नगरीत रविवार रोजी गुणवंत शिक्षकांचा शानदार पुरस्कार वितरण सोहळा
मा मुख्याध्यापक पी एस निकाळे सर यांच्या स्मरणार्थ माणुसकी फाउंडेशन चा अभिनव सोहळा
दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे
सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रस्थानी असलेल्या व विविध उपक्रमांनी नावलौकिक मिळविलेल्या निफाड येथील माणुसकी फाउंडेशनच्या वतीने सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रल्हाद सिताराम निकाळे (सर) वनसगाव यांच्या स्मरणार्थ शिक्षक दिनाचे औचित्य साधत माणुसकी फाउंडेशन निफाड यांच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील निवडक व उपक्रमशील शिक्षकांना आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे अशी माहिती माणुसकी फाउंडेशन निफाड चे संस्थापक अध्यक्ष पत्रकार सागर निकाळे यांनी दिली आहे.
निफाड येथील श्री लक्ष्मी नागरी ग्रामीण पतसंस्थेचे संस्थापक नंदलालजी चोरडिया यांच्या अध्यक्षतेखाली व पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रमुख वक्ते ज्येष्ठ लेखक ,साहित्यिक व राष्ट्रपती पदक विजेते मा .बी जी शेखर साहेब मा विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक पोलीस परिक्षेत्र यांच्या शुभहस्ते रविवार दिनांक ७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता श्री लक्ष्मी नागरी ग्रामीण पतसंस्था, सरकारी दवाखान्याजवळ, कोळवाडी चौफुली, उगाव रोड निफाड येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात येणार आहे.
आदर्श व गुणवंत शिक्षक पुरस्कारार्थी पुढील प्रमाणे-
अनिल कुंभार्डे- महावीर विद्यालय लासलगाव,अनिलसिंग परदेशी- न्यू इंग्लिश स्कूल आंबे दिंडोरी, मुकुंद ताकाटे सर.के .आर.टी हायस्कूल,मौजे सुकेणे, मुख्याध्यापक दिलिप कोथमीरे सर डोंगरगाव, डॉ.सुजाता गडाख-के टी एच एम कॉलेज नाशिक, पांडुरंग गोविंद देवरे जि प प्रा शाळा राजोळे वस्ती,नवनाथ डुंबरे -जि.प.मॉडेल स्कूल सारोळे थडी, नितीन ठुबे- क भा पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साकोरे ता.नांदगाव,प्राचार्य श्री.प्रदीप सांगळे -कनिष्ठ महाविद्यालय शिवरे, बाजीराव कमानकर शाळा भेंडाळी,बाबासाहेब आवारे जिल्हा परिषद शाळा वाकद, बाळासाहेब आडसरे- आरुढ विद्यालय म्हाळसाकोरे, सौ.मंदाकिनी भागवत जि .प शाळा बोकडदरे, रतन शेळके जिल्हा परिषद शाळा रुई, रवींद्र गीते परमपूज्य तुकाराम बाबा विद्यालय खेडले झुंगे,राजेंद्र परदेशी मुख्याध्यापक जि प शाळा मोहाडी, विलास फड जि प शाळा विष्णुनगर, श्रीमती.मनीषा सानप- श्री संत हरिबाबा विद्यालय पांगरी,ता.सिन्नर, सौ.करुणा दिपक गायकवाङ- न्यू इंग्लिश स्कूल,चांदोरी सुदर्शन जाधव अभिनव बाल विकास मंदिर,येवला,सुरेंद्र जगन्नाथ पगारे -अधीक्षक आनंद विद्यार्थी आश्रम,निफाड सौ.ज्योती कुमावत -निफाड इंग्लिश स्कूल, सोमनाथ मापारी जि प शाळा उगाव, उमेश प्रभाकर कुलकर्णी नवीन इंग्रजी शाळा ओझर, दिपक कडू हिरे जि.प.प्रा.शाळा-सरोदेवस्ती मालेगाव, श्री.राजेंद्र दुनबळे – मुख्याध्यापक जि.प.शाळा आहेरवाडी ता.येवला के.एम.गाजरे- मुख्याध्यापक ङी.आर.भोसले विद्यालय देवगाव, आनंदा दत्तात्रय राजगुरू, मुख्याध्यापक जि. प. शाळा वनसगाव, कुंदन कुमार जाधव श्री.छञपती शिवाजी विद्यालय वनसगाव, सौ.रोहिणी जानकीराम धारराव, जि प शाळा सारोळे खुर्द, पोपट आप्पा मोरे जि. प शाळा ,पिंपळस, वाल्मीक जगन्नाथ खापरे जि प शाळा वरद विनायक वस्ती,नांदुर्डी, प्रा शंकर बन्सी गायकवाड कर्मवीर गणपत दादा मोरे महाविद्यालय ,निफाड, कारभारी गावंडे जि .प शाळा ,देवगाव,सौ भारती सुभाष उगले, सौ.अश्विनी प्रसन्न पवार एन.व्ही.पी कॉलेज, लासलगाव, श्री.एम.पी.आहीरे सर, श्री.भालचंद्र सुर्यवंशी छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय उगाव, श्री.नवनाथ खरे, श्री किरण शिंदे आदींना जाहीर करण्यात आले आहे अशी माहिती माणुसकी फाउंडेशन निफाड चे संस्थापक पत्रकार सागर निकाळे यांनी दिली आहे.






