आशाताई बच्छाव
भोकरदन तालुक्याची व्यथाच न्यारी शासकीय कार्यालयामध्ये वरिष्ठ पदी सर्व प्रभारी
गजेंद्र लोखंडे तालुका प्रतिनिधी भोकरदन.
जालना जिल्ह्यात आठ तालुके आठ तालुक्यातील हा एक भोकरदन तालुका आजच्या घडीला या तालुक्यात तहसील कार्यालय पंचायत समिती गटविकास अधिकारी उपविभागीय अधिकारी कार्यालय असून या कार्यालयामध्ये उच्च पदस्थ हे m.p.s.c तथा u.p.s. दर्जाचे अधिकारी असतात परंतु एक ते दोन महिन्यापासून या भोकरदन तालुक्यातील तहसील कार्यालयात तहसीलदार प्रभारी उपविभागीय अधिकारी पदी प्रभारी गट विकास अधिकारी पंचायत समिती भोकरदन प्रभारी कृषी अधिकारी प्रभारी त्यामुळे सामान्य नागरिकांची काही कामे पदसिद्ध अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीनेच होतात ती कामे अधिकाऱ्यांच्या टेबलावरती बऱ्याच दिवसापासून संचिका अथवा फायली धुळ खात पडून आहे शेतकरी त्रस्त आहे विद्यार्थी त्रस्त आहे शेतकऱ्यांच्या फेरफार बाबत असो बांधा बाबत असो व पांदण रस्त्याबाबतच्या तक्रारी असो त्याचा निपटारा होत नसून शेतकऱ्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी वादविवाद झाल्याचे पाहायला मिळत आहे बऱ्याचशा प्रकरणांमध्ये शासनाचे नियम डावले जाऊन निर्णय दिले जात आहे याबाबत अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता आमच्याकडे प्रभारी पद असल्याने सही करता येत नाही निर्णय घेतात नाही नवीन अधिकारी यांची नियुक्ती झाल्यास त्यावेळेस तुमची काम करून घ्या असा सल्ला दिला जात आहे म्हणूनच म्हणावसे वाटते भोकरदन ची व्यथाच न्यारी वरिष्ठ पदावर सर्व प्रभारी अशा या द्विधा परिस्थितीत भोकरदन तालुक्याची जनता भरडली जात असून कोणतीच कामे होताना दिसत नाही आहे या कार्यालयाशी सामान्य नागरिक शेतकरी विद्यार्थी अपंग निराधार अशा व्यक्तींची कामे असून ते कामे होत नसल्याने ते त्रस्त आहे भोकरदन तालुक्यातील बरीचशी गावे 30 ते40 किलोमीटर अंतरापर्यंतची जोडलेली असून बरेचशे गावे विदर्भाच्या सीमेसी जोडली गेलेली आहे या ठिकाणाहून नागरिक भोकरदन तालुक्याच्या ठिकाणी कामानिमित्ताने येतात व दिवसभर थांबून कामे न झाल्यास रिकाम्या हाताने परत जातात त्यामुळे कुठेतरी जनतेच्या मनामध्ये अधिकाऱ्याच्या बाबतीत रोष निर्माण झाल्याचे पहावयास मिळत आहे या कार्यालयात वरिष्ठ पदी प्रभारी असल्याने खालील कर्मचारी सुद्धा कार्यालयामध्ये कधी आहे तर कधी नाही कधी दहा कधी बारा अशा वेळेला या कार्यालयात हजर होत असल्याचे पहावयास मिळत आहे नव्याने वरिष्ठ अधिकारी कधी पदस्थ होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहेत.