आशाताई बच्छाव
जालना भोकरदन महामार्गांवर केदारखेडा राजूर शिवारात बस आणि दुचाकी अपघात दोन तरुण जागीच ठार
जाफ्राबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
सविस्तर वृत्त असे की हॉलतिकीट घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यासह मित्राच्या दुचाकीला एस. टी. महामंडळाच्या मानव विकास बस चालकाने जोराची धडक दिली. धडक इतकी जोराची होती की दुचाकी वरील दोघे मित्र जागीच मृत्यू मुखी पडले. यामध्ये 1) विकी कैलास जाधव वय 20 वर्ष रा. चंदनझिरा ता. जालना जि. जालना. 2) भूषण गंगाधर लोखंडे वय 18 वर्ष रा. अवघडराव सावंगी ता. भोकरदन जि. जालना अशी मृत पावलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.
त्यांचे मृतदेह उत्तर तपासनीसाठी भोकरदन ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते.मृतकांची नोंद भोकरदन पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.