Home जालना स्वामी विवेकानंद हायस्कूल व कनिष्ठ कला महाविद्यालय बुटखेडा या शाळेत विद्यार्थी संसद...

स्वामी विवेकानंद हायस्कूल व कनिष्ठ कला महाविद्यालय बुटखेडा या शाळेत विद्यार्थी संसद निवडणूक 2025 पार पडली

85

आशाताई बच्छाव

1001752104.jpg

स्वामी विवेकानंद हायस्कूल व कनिष्ठ कला महाविद्यालय बुटखेडा या शाळेत विद्यार्थी संसद निवडणूक 2025 पार पडली

जाफ्राबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके

सविस्तर वृत्त असे की विद्यार्थी संसद निवडणूक 2025 ही दिनांक 26 /07/2025 रोजी पार पडली विद्यार्थ्यांनी लोकशाही पद्धतीने प्रतिनिधी निवडण्याचा आनंद घेतला. या निवडणुकीची अधिसूचना प्राचार्यांनी दिनांक 24 /07/ 2025 रोजी काढली व संपूर्ण निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला त्यानुसार दिनांक 25 /07/ 2025 रोजी 11 ते एक वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ देण्यात आली होती. एक ते दीड वाजेपर्यंत अर्जाची छाननी दीड ते दोन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची वेळ .होती त्यानंतर सव्वातीन ते सव्वाचार वाजेच्या वेळेत विद्यार्थ्यांनी सर्व विद्यार्थ्यांसमोर आपला परिचय देऊन विद्यार्थ्यांना आपली भूमिका सांगण्यासाठी प्रचारासाठी प्रत्येक उमेदवाराला पाच पाच मिनिटांचा वेळ देण्यात आला होता .यावेळेस सर्व विद्यार्थ्यांनी आपला परिचय व प्रचार केला मतदानाची वेळ व दिनांक 26/07/2025.शनिवारी सकाळी साडेआठ ते दहा या वेळेत मतदान घेण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आधार कार्ड आपली ओळख दाखवण्यासाठी आणायचे होते. त्यानंतर ओळख पटवून , त्यांचे नाव लिहिणे ,सही घेणे बोटाला शाही लावणे व मतपत्रिका देणे या प्रक्रिया पार पाडण्यात आल्या सर्व वर्गाचे जवळपास शंभर टक्के मतदान झाले विशेष म्हणजे या मतदानात एक मत सुद्धा बाद झाले नाही मतदान करताना प्रत्येक विद्यार्थ्याला एक मत आपल्या वर्गप्रतिनिधीसाठी, एक मत शाळा प्रतिनिधी विद्यार्थिनी, व एकमत शाळा प्रतिनिधी विद्यार्थी .असे तीन मत द्यायचे होते ते सर्व विद्यार्थ्यांनी अचूक दिले त्यामुळे एकही मत बाद झाले नाही या निवडणुकीत आठवी अ मधून मानव मिलिंद गवई, आठ ब मधून ओम गजानन कल्याणकर, नऊ अ मधून सायली सर्जेराव पांडव ,नऊ मधून लक्ष्मी संतोष सवडे ,10 अ मधून कृष्णा अर्जुन पाचरणे ,दहा ब मधून अनिकेत परमेश्वर शेडगे .हे सर्व विद्यार्थी वर्ग प्रतिनिधी म्हणून निवडून आले, तर शाळा प्रतिनिधी विद्यार्थिनी कुमारी सृष्टी ज्ञानेश्वर बनकर .शाळा प्रतिनिधी विद्यार्थी आदित्य दिलीप मस्के हे निवडून आले सर्व विजयी उमेदवारांचे प्राचार्य प्रशिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या या निवडणुकीत निकाल जाहीर होत असताना विद्यार्थ्यांनी गुलाल उधळून ढोल ताशा वाजवून भर पावसामध्ये ओले होत आनंद व्यक्त केला सर्व निवडणूक शांततेत सुव्यवस्थित पार पडली.

Previous articleभोकरदन शहर व आसपासच्या परिसरामध्ये वरून राजाचे आगमन
Next articleजालना भोकरदन महामार्गांवर केदारखेडा राजूर शिवारात बस आणि दुचाकी अपघात दोन तरुण जागीच ठार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.