आशाताई बच्छाव
भोकरदन शहर व आसपासच्या परिसरामध्ये वरून राजाचे आगमन
भोकरदन प्रतिनिधी गजेंद्र लोखंडे
भोकरदन तालुक्यात व महाराष्ट्रात पावसाने सात ते आठ दिवसापासून विश्रांती घेतली होती परंतु आज सामान्य तापमानापेक्षा आजच्या तापमानामध्ये वाढ झाल्याचे पहावयास मिळत होते त्यामुळेच दमट वातावरण तयार होऊन पावसाला सुरुवात झाली सायंकाळच्या वेळी साडेपाच ते सहा वाजता भोकरदन शहर व तालुक्यामध्ये पावसाला सुरुवात झाली या पावसाने शेतातील पिकांना जीवनदान मिळाले आहे शेतकरी राजा निराशा जनक परिस्थितीमध्ये पहावयास मिळत होता परंतु वरून राजाने आज हजेरी दिल्याने शेतकऱ्यांच्या पुढील आशा पल्लवी झाल्या आहे मिरची असो सोयाबीन मका अशी शेतात पेरलेली पिके सुखाला सुरुवात झाली होती एक हिंदी मध्ये म्हण आहे जिसका कोई नही उसका खुदा है यारो खरंच या मनीप्रमाणे त्या देवाला सर्वांची चिंता असते म्हणूनच ज्या ढगाकडे ज्या आकाशाकडे शेतकरी आतुरतेने या पावसाची वाट बघत होता त्या पावसाला कुठेतरी आज सुरुवात झालेली आहे मला असं वाटतं येणारा हा पाऊस एक ते दोन दिवस सतत राहिला तर गोरगरीब शेतकरी यांचे पुढील सण हे आनंदात जातील व शेतकरी राजा आपला हा बैलपोळा सण मोठ्या उत्साहाने साजरा करेल.