आशाताई बच्छाव
विरदेल येथे शिंपी समाज तर्फे श्री जयवंत कापडे यांचा सत्कार…
(विरदेल प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)
विरदेल ता. शिंदखेडा– श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विरदेल येथे शिंपी समाजाच्या वतीने भव्य पूजन व आरतीचे आयोजन करण्यात आले. याच कार्यक्रमात, समाजातील कर्तृत्ववान आणि कष्टमय प्रवासातून यशस्वी झालेल्या रेडिओ विकास भारती केंद्र, नंदुरबारचे प्रमुख श्री. जयवंत कापडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
सामान्य पार्श्वभूमीतून पुढे येत, जयवंत कापडे यांनी सामाजिक भान जपत रेडिओ माध्यमातून ग्रामीण जनतेसाठी उत्कृष्ट कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य महासंचालनालयामार्फत “आशा सर्वोत्तम कम्युनिटी रेडिओ केंद्र पुरस्कार 2025” देण्यात आला. हा पुरस्कार सुप्रसिद्ध गायिका पद्मभूषण आशा भोसले, मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या गौरवाच्या निमित्ताने शिंपी समाज, विरदेल यांच्या वतीने जयवंत कापडे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात त्यांच्या संपूर्ण रेडिओ टीमच्या कार्याचे कौतुकही करण्यात आले.
यावेळी शिंपी समाजाचे अध्यक्ष श्री. दगाशेठ जाधव, गोपालशेठ शिंपी, कैलास जगताप, राजेंद्र जगताप, योगेश जगताप, बापू जाधव, वीरेंद्र जाधव, एकनाथ जाधव, भागवत जगताप, गणेश जगताप, सुरेश कलाल, प्रवीण जगताप आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना जयवंत कापडे यांनी, “समाजाच्या मुळाशी राहून, समाजासाठी कार्य करण्याची संधी लाभणे हीच खरी मिळकत आहे. हा सन्मान माझ्या टीमच्या प्रत्येक सदस्याचा आहे,” असे सांगत मनःपूर्वक आभार मानले.