Home उतर महाराष्ट्र दारूबंदीची लढाई अजून मोठी होणार आहे… नाडसे गावाचा आवाज आता संपूर्ण तालुक्यात...

दारूबंदीची लढाई अजून मोठी होणार आहे… नाडसे गावाचा आवाज आता संपूर्ण तालुक्यात घुमतोय… पोलिसांची झोप उडेल की यंत्रणा पुन्हा झोपलेलीच राहील?

94

आशाताई बच्छाव

1001701800.jpg

दारूबंदीची लढाई अजून मोठी होणार आहे… नाडसे गावाचा आवाज आता संपूर्ण तालुक्यात घुमतोय… पोलिसांची झोप उडेल की यंत्रणा पुन्हा झोपलेलीच राहील?                                                          धुळे नंदुरबार संदीप वसंतराव पाटील ब्युरो चीफ 

साक्री तालुक्यातील नाडसे गावात गावठी व देशी दारू विक्रीने थैमान घातले असून, त्याविरोधात अखेर गावकरी रस्त्यावर उतरले. अनेक कुटुंबांचे संसार उध्वस्त करणाऱ्या या अवैध धंद्याला आळा घालावा, यासाठी गावातील महिलांनी पोलिस प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला. सदर प्रकाराची गंभीर दखल घेत गावकरी आणि महिला यांनी एकत्र येत साक्री पोलीस ठाण्यात हजर राहून पोलीस निरीक्षक दीपक

वळवी यांना निवेदन दिले. महिलांच्या डोळ्यात अश्रू होते, हृदयात वेदना होत्या, पण शब्द होते ठाम – “दारू बंद झालीच पाहिजे!”

महिलांनी पोलिसांवरही थेट आरोप केले की, “गावात पोलिसांच्या डोळ्यादेखत सर्रास दारू विक्री सुरू असते, मग एवढा

अंधार कुठून येतो?” अशा शब्दांत पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पोलिसांची लक्तरे वेशीला टांगली.

लाचखोरीचा गंभीर आरोप

गावकऱ्यांचा स्पष्ट आरोप होता की, काही दारू विक्रेते पोलिसांना लाच देऊन धंदा बिनधास्तपणे चालवतात. त्यामुळे कारवाई होत नाही आणि गावात दारूच्या गंजलेल्या बाटल्या वाढतच आहेत. “कायदा फक्त कागदावरच राहिला आहे का?” असा सवाल ग्रामस्थांनी केला.

Previous articleप्रेम संबंधातून महिलेचा खून आरोपी काही तासात जराबंदी स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Next articleनैताळे येथील बाबुराव भवर यांचे निधन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.