आशाताई बच्छाव
आदर्श व सुसंस्कृत पिढी घडविण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देणे गरजेचे
श्री निलेश कुलकर्णी व सौ शलाका कुलकर्णी भुसावळ यांचे मत
दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक रामभाऊ आवारे तालुका प्रतिनिधी
आपल्या मुलाबरोबरच इतरही मुलांवर बाल वयातच थोर साधू संतांचे विचार व आदर्श निर्माण करण्यासाठी सातत्याने धडपडणारे भुसावळ येथील निलेश कुलकर्णी व सौ शलाका कुलकर्णी हे कुटुंबीय–
असंख्य संतांच्या ,थोर महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या भारत देशात, या संत, महापुरुषांच्या शौर्याचे, चांगल्या गुणांचे वर्णन ,कथा आज देखील आपल्या पुढील पिढीला सांगितल्या जातात. आपल्या देशात प्रत्येक सण, उत्सव उत्साहात साजरे करण्याची परंपरा चालत आली आहे. पण आजच्या बदलत्या जीवनशैली सोबत ह्या सण उत्सव साजरे करण्याचे रूप देखील बरेच बदललेले दिसून येते.आपल्या पुढील जन्माला येणारी पिढीच खर तर आपल्या देशाचा मजबूत आधार स्तंभ असणार आहे.सामाजिक जीवनात वावरताना प्रत्येक व्यक्तीला वाटत असते, आपण व आपल्या सोबत आपल्या मुलांनी ही समाजात एक चांगला उत्तम माणूस म्हणून सिद्ध व्हावे. आजच्या बदलेल्या भाषेत सांगायचे तर कॉम्पिटीशन मध्ये टिकणे पण तो उत्तम माणूस म्हणून त्याच वेळेस सिद्ध होतो, ज्या वेळेस त्या माणसाचा वरपांगी विकास होण्यापेक्षा त्याच्या अंतरमनाचा सर्वांगीण विकास पूर्णतः झालेला असतो. आणि या विकास होण्याच्या मुख्य काळाला सुरुवात म्हणजे बालपण. खर तर बाल मन हे अफाट कल्पनाशक्ती ने भरलेले आणि अनुकरण प्रिय असते .या काळात मुलांना शाळेतील शिक्षणा सोबत उत्तम संस्कार आणि चांगले आदर्श त्यांच्या पुढे ठेवले तर हीच भावी पिढी खर तर आपल्या देशाचे भवितव्य ठरवणारी असेल मग आदर्श कोणाचे असावेत हो? स्वतःच्या जीवाची परवा न करता स्वराज्यासाठी लढणाऱ्या माझ्या शिवाजी राजे संभाजी राजे, आपल्या मातृभूमीला भेटण्यासाठी व्याकुळ झालेला प्राण आणि त्या साठी बोटीतील टॉयलेट च्या खिडकीमधून समुद्रात उडी टाकत भारत मातेला परतण्यासाठी धडपड करणाऱ्या सावकार, स्वतःच्या संसाराची परवा न करता समस्त स्त्री जातील शिक्षणाचा वारसा देणाऱ्या सावित्री बाईंचा… अश्या अनेक थोर महात्मे यांचे आणि खऱ्या अर्थाने आजच्या पिढीतला संपत चाललेला संयम शिस्त यासाठी आपल्या वारकरी संप्रदायातील प्रत्येक संतांचे आदर्श त्या मागील इतिहास हा आजच्या पिढीतील मुलांच्या विकासासाठी खरच गरजेचा वाटतो.हाच विचार करत आज समाजातील बरेच सजग पालक आपल्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी धडपड करतांना दिसून येतात.त्यातीलच भुसावळ या ठिकाणी रहाणारे सुशिक्षित कुलकर्णी कुटुंबीय.






