Home उतर महाराष्ट्र नेवासेत ‘विठ्ठलनामा’ने ज्ञानमंदिरे दुमदुमली!

नेवासेत ‘विठ्ठलनामा’ने ज्ञानमंदिरे दुमदुमली!

82

आशाताई बच्छाव

1001674850.jpg

नेवासेत ‘विठ्ठलनामा’ने ज्ञानमंदिरे दुमदुमली!
नेवासा/ अहिल्यानगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे: आषाढी एकादशीनिमित्त शनिवारी (ता.५) नेवासा तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद व इंग्रजी माध्यमातील शाळेंच्या बालवारकऱ्यांनी पालखी व दिंड्या काढल्या. दरम्यान, या चिमुरड्या बालवारकऱ्यांना दिंड्यांदरम्यान केलेल्या “ज्ञानोबा.. माऊली.. तुकाराम” व विठ्ठलनामांच्या जयघोषांनी तालुक्यातील बहुतांशी ज्ञानमंदिरांसह गावे दुमदुमली होती.
चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दिंड्यांची पर्वणी
आषाढी एकादशी रविवारी आल्याने नेवासा तालुक्यांतील जिल्हा परिषद व इंग्रजी माध्यम शाळांनी आजच (शनिवारी) दिंड्या व पालख्यांचे नियोजन केले होते. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी जणू पर्वणी साधून दिंड्या, पालखी काढून भक्तीमय वातावरण निर्माण करत विठ्ठल रुक्मिणी, संत आणि वारकरी वेशातील बालवारकर्‍यांनी शाळा ते गावातून दिंड्या काढल्या होत्य
विठ्ठल-रुख्मीनीमाता चरणी झाडे पावसासाठी प्रार्थना
दरम्यान, बालवारकऱ्यांच्या शिस्तबध्द व नियोजनबद्ध दिंड्यांनी गावागावातील नागरिकांचे लक्ष वेधले होते. “भरपूर पाऊस पडू दे, सारी जीवसृष्टी आनंदी होऊ दे..अशी प्रार्थना विठ्ठल-रुख्मीनीमाता चरणी करत एकतरी झाड लावू या, जगवू या.. असा संकल्प लोहगाव प्राथमिक शाळेच्या बालवारकरी विद्यार्थ्यांनी केला. मृदुंग, टाळ व चिपळ्यांचा नाद आणि शिरावर तुळशी घेतलेल्या मुली, विठ्ठल- रुख्मिनी, संत-वारकर्‍यांचे सजीव देखावे लक्षवेधक ठरत होते.
नेवासेत ‘विठ्ठलनामा’ने ज्ञानमंदिरे दुमदुमली!
विद्यार्थ्यांनी विठ्ठल माऊलीच्या गजरात फुगडी, लंगडी, पावली यासह रिंगण सोहळा साजरा केला. आषाढी एकादशीनिमित्त नेवासे फाटा येथील ज्ञानदीप इंग्लिश स्कूलच्या सुमारे सहाशेहून अधिक बालवारकरी विद्यार्थ्यांनी नेवासे शहरातून काढलेल्या दिंडीचे व पालखी पूजन माजी सभापती सुनिताताई गडाख यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्या दिंडीत सहभाग घेत बालवारकऱ्यांची रमल्या. मिरवणुकीमध्ये विद्यार्थ्यांनी लेझीम, ढोल, लाठी-काठी, तायक्वांदो, पथसंचलन, पावली नृत्य आणि घोडा मिरवणूक सादर करून उपस्थितांची मने जिंकली

Previous articleअजित पवार यांनी दिल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम जनतेला शुभेच्छा
Next articleयुनिटी फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.