Home उतर महाराष्ट्र श्री.अनिल बागुल सर यांचा बहुजन समाज पार्टी पक्षात जाहीर प्रवेश

श्री.अनिल बागुल सर यांचा बहुजन समाज पार्टी पक्षात जाहीर प्रवेश

116

आशाताई बच्छाव

1001657645.jpg

श्री.अनिल बागुल सर यांचा बहुजन समाज पार्टी पक्षात जाहीर प्रवेश
श्रीरामपूर दिपक कदम तालुका प्रतिनिधी –राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर येथील आयोजित कार्यक्रमामध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीने अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील गावागावातून, खेड्यापाड्यातील बहुजन समाज पार्टीच्या भीमसैनिकांनी आणि माता भगिनींनी हजेरी लावली होती. या भव्यदिव्य कार्यक्रमाला महाराष्ट्र समन्वयक मा.खा. राजाराम साहेब, महाराष्ट्र प्रभारी मा. ॲड. सुनिल डोंगरे साहेब, बहुजन समाज पार्टी पुणे झोन प्रभारी मा. शिक्षण उपसंचालक तथा महाराष्ट्र सचिव मा. रामचंद्र जाधव साहेब, पुणे झोन प्रभारी मा.हुलगेश चलवादी साहेब, विविध झोन प्रभारी तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मा.सुरेश कांबळे, विविध जिल्ह्यांतील जिल्हाध्यक्ष, जिल्हा प्रभारी मा. सुनिल ओहळ आदींच्या उपस्थितीत श्री. अनिल बागुल सर यांचा बहुजन समाज पार्टी या पक्षात जाहीर प्रवेश केला. बहुजन समाज पार्टीचे मा. खा. राजाराम, प्रदेश अध्यक्ष ॲड. सुनिल डोंगरे, शिक्षण उपसंचालक पुणे झोन प्रभारी रामचंद्र जाधव साहेब यांनी श्री . अनिल बागुल सर यांचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तसेच जिल्हा कोषाध्यक्ष या दोन महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करुन पक्षात आल्याबद्दल स्वागत केले , आणि पक्षाच्या भरीव कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. उपाध्यक्ष शहवाज पठाण, सचिव चंद्रकांत दोंदे, आकाश शेंडे, उमाकांत यादव, विधानसभा अध्यक्ष जाकिरभाई शहा , विधानसभा प्रभारी सुनिल मगर, मच्छिंद्र ढोकणे, बबनराव बोरगे, भारत त्रिभुवन, शेंडगे मामा आदि जिल्ह्याचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. मा. शिक्षण उपसंचालक पुणे झोन प्रभारी श्री. रामचंद्र जाधव साहेब तसेच जिल्हाध्यक्ष श्री. सुरेश कांबळे सर आदींच्या शुभहस्ते श्री. अनिल बागुल सर यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी अनिल बागुल सर यांनी पक्ष संघटन, पक्ष वाढीसाठी आपण या पुढे कायमच प्रयत्नशील राहून बहुजन समाज पार्टी राष्ट्रीय अध्यक्षा मा. मुख्यमंत्री बहेन मायावती यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल धन्यवाद दिले.

Previous articleखेड पंचायत समितीत कृषीदिन कार्यक्रम उत्साहात साजरा
Next articleसंतोष द्याडे यांना पीएच.डी. प्रदान.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.