Home बुलढाणा पातूर्डा गावकऱ्यांच्या आंदोलनाचा धसका: लवकरच प्रा.आरोग्य केंद्र इमारत बांधकाम होईल सुरू जि....

पातूर्डा गावकऱ्यांच्या आंदोलनाचा धसका: लवकरच प्रा.आरोग्य केंद्र इमारत बांधकाम होईल सुरू जि. प. बांधकाम कार्यकारी अभियंत्याची ग्वाही

83

आशाताई बच्छाव

1001652399.jpg

पातूर्डा गावकऱ्यांच्या आंदोलनाचा धसका: लवकरच प्रा.आरोग्य केंद्र इमारत बांधकाम होईल सुरू जि. प. बांधकाम कार्यकारी अभियंत्याची ग्वाही
प्रतिनिधी स्वप्निल देशमुख
पातूर्डा तालुका संग्रामपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे दोन वर्षापासून रेंगाळलेले बांधकाम त्वरित सुरू करावे अन्यथा १ जुलै रोजी जिल्हा परिषद वर गावकऱ्यांना घेऊन धडकणार असल्याचा इशारा मा. जिल्हा परिषद उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ यांनी दिला होता. त्या आंदोलनाचा धसका घेत आज दि. ३० जून रोजी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी पातूर्डा गावात दाखल झाले त्यांनी संगीतराव भोंगळ यांच्या सोबत जिल्हा परिषद बांधकामचे
मुख्य कार्यकारी अभियंता गुडदे ,शाखा अभियंता व्ही एल जुमळे, व एस एस कुलकर्णी यांनी
प्रा.आरोग्य केंद्र इमारत बांधकाम बाबत दीर्घ चर्चा करून स्थळ पाहणी करीत उद्याच बांधकामास सुरुवात केल्या जाईल असे
आश्वासन देत
आपले आंदोलन तूर्त थांबवण्याची विनंती केली.
पातूर्डा प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत बांधकामासाठीची सर्व प्रक्रिया होऊन सुद्धा काम सुरू होत नसल्याने मोठ्या लोकसंख्येचे पातूर्डा गाव व आजुबाजूच्या १० – १२ खेड्यातील नागरिकांना आरोग्य सेवेबाबत प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याने आरोग्याचा प्रश्न बिकट झाला आहे आरोग्य केंद्राची इमारत जमीनदोस्त केल्याने एकाच खोलीतून आरोग्य कर्मचारी कारभार पाहत असल्याने शेतकरी, शेतमजूर,गर्भवती महिला, अबाल , वृद्ध यांना शेगाव शिवाय पर्याय नसल्याने नागरिकांना या महागाईच्या काळात आर्थिक झळ सहन करावी लागत असल्याने, प्रा आरोग्य केंद्राच्या नवीन इमारत मंजूर होऊन सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असतानाही दप्तर दिरंगाईमुळे बांधकामास मुहूर्त मिळत नसल्याने, इमारत बांधकाम त्वरित सुरू करण्यासाठी संगीतराव भोंगळ यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन पातूर्डा गावात ठिकठिकाणी बैठका घेऊन जनजागृती करीत प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचा लढा विस्तीर्ण करीत गावकऱ्यांसोबत चर्चा करून मंगळवारी जिल्हा परिषद समोर आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने त्या आधीच जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी आंदोलनाचा धसका घेऊन त्यांच्या मागण्या मान्य केल्याने आरोग्य केंद्र इमारतीच्या लढ्यास यश मिळाले आहे. याआधी सुद्धा पाणीपुरवठा योजनेसाठी संगीतराव भोंगळ यांनी पाच दिवस उपोषण करीत गावचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविला होता हे विशेष.

 

@चौकट @
हे गावकऱ्यांनी गावासाठी उभारलेल्या लढ्याचे यश – संगीतराव भोंगळ
प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत बांधकाम त्वरित सुरू करण्यासाठी उभारलेल्या लढ्यास गावकऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिल्याने एक लोक चळवळ उभी राहिली आणि या लोक चळवळीच्या माध्यमातून आमचा लढा यशस्वी झाला हे सर्व गावकऱ्यांचे यश असल्याची प्रतिक्रिया मा. जि.प. उपाध्यक्ष भोंगळ यांनी दिली

Previous articleप्रा.आनंद भोजने, राजर्षी शाहू प्रेरणा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित…
Next articleमाहोरा येथे काळ्या पोशाखातील चोरटे अंदाजे 5,80,000 /- रु. चा माल घेऊन पसार माहोरा भयभीत
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.