आशाताई बच्छाव
प्रा.आरोग्य केंद्रासाठी पातूर्डा गावकरी १ जुलै रोजी धडकणार जिल्हा परिषद वर – संगीतराव भोंगळ
स्वप्निल देशमुख
पातुर्डा ता. संग्रामपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रेंगाळत असलेले इमारत बांधकाम तत्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी पातूर्डा गावकरी १ जुलै रोजी जिल्हापरिषद बुलढाणा येथे धडकणार असल्याचा इशारा जिल्हा परिषद उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ यांनी दिला आहे.
प्रशासक काळात जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची सुरू असलेली मनमानी त्यामुळे गावातील व परिसरातील नागरिकांना उपलब्ध होत नसलेली आरोग्य सेवा यासाठी गत सात वर्षापासून भोंगळ यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्याने सदर इमारत बांधकामास मंजुरात देण्यात आली होती यासाठी तत्कालीन अधिकारी लोकप्रतिनिधी यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते आजही कोणत्याच लोकप्रतिनिधीचा या कामाला विरोध नसतानाही निव्वळ अधिकाऱ्यांची मनमानी वेळकाढू धोरणाने या इमारतीच्या कामास उशीर होत आहे.त्यामुळे या परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात व्यक्त होत असलेला रोष गावात ठिकठिकाणी बैठका घेऊन व्यक्त केल्या जात असून गावासाठी केल्या जाणाऱ्या या आंदोलनाचे नेतृत्व संगीतराव भोंगळ करीत असून त्यांच्या लढ्यास गावकरी मोठ्या संख्येने प्रतिसाद देत असून लवकर काम सुरू न झाल्यास बुलढाणा धडक देणार आहेत.
@ चौकट
*मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यावर कार्यवाही करा*
मौजे पातुर्डा बु. गावासह लगतच्या १३ ते १४ खेड्यांची लोकसंख्या पाहता, पातुर्डा बु. येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची नितांत आवश्यकता आहे. २०२०- २१ मध्ये या इमारतीस मंजुरात मिळाली होती मात्र वेळकाढू धोरणाने ती रद्द होऊन परत २०२३ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली असताना १ वर्षा आधी इमारत जनसेवेसाठी समर्पित होणे गरजेचे होते.मात्र दप्तर दिरंगाईने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाईची एकमुखी मागणी होत आहे.
@ चौकट
पातूर्डा गावात जनआंदोलनासाठी बैठका
फेब्रुवारी महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असताना जून पर्यंत काम प्रगतीपथावर असणे अपेक्षित होते परंतु आजपर्यंत कामाची साधी सुरुवात सुद्धा झाली नसल्याने
प्रशासनाच्या विरोधात गावात रोष निर्माण होत असून आरोग्य सेवे बाबत होत असलेल्या अन्यया विरुद्ध आंदोलनासाठी संगीतराव भोंगळ गावात कॉर्नर बैठका घेत असून त्या बैठकींना गावकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद प्रशासनावरील रोष स्पष्ट व्यक्त होत आहे.






