Home उतर महाराष्ट्र डि.पॉल हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात

डि.पॉल हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात

172

डि.पॉल हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात

श्रीरामपूर:(प्रतिनिधी दिपक कदम)-येथील विन्सेन्शन मिशन सर्विस सोसायटी संचलित डिपॉल इंग्लिश मिडीयम हायस्कूलमध्ये नुकताच आंतरराष्ट्रीय योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रसंगी इ.पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांना योगा प्रशिक्षक पुजा जतिन सोलंकी यांनी बहुमोल मार्गदर्शन केले.
यावेळी कु.वृंदा संतोष सोले(इ.आठवी) हिने विद्यार्थ्यांसमोर ताडासन, भुजंगासन,वृक्षासन, पवनमुक्तासन,मकरासन, हनुमानासन,भुमासन, नटराजासन,पादहस्तासन, वज्रासन,वक्रासन, अर्धचक्रासन,शलभासण, त्रिकोणासन या आसनांची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांची मने जिंकली. दरम्यान विद्यार्थ्यांनी सदर आसनांची प्रात्यक्षिके सादर करत योगा दिनाचे महत्त्व जाणून घेतले.
यावेळी कार्यक्रमास संस्थेचे व्यवस्थापक फादर सिजो, प्रशासक फा.फ्रँको,प्राचार्या सिस्टर ब्लेसा,समन्वयक सि. रेन्नी,सचिव मॉली कुथूर, वरिष्ठ लिपिक रवी लोंढे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मॉली कुथूर यांनी केले.

Previous articleखारघर वाहतूक पोलिस शाखेचा अनोखा उपक्रम वाहन चालकांसाठी दंड तपासणी व भरण्याची सुविधा उपलब्ध
Next articleश्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे भारतीय जनता पार्टी श्रीरामपूर यांच्याकडून भव्य स्वागत
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.