Home वाशिम मोकाट सांड/वळू च्या पायातील खिळा काढणे म्हणजे ,वाघाच्या गळ्यात घंटा बांधण्यासारखे होय-अक्षय...

मोकाट सांड/वळू च्या पायातील खिळा काढणे म्हणजे ,वाघाच्या गळ्यात घंटा बांधण्यासारखे होय-अक्षय लोटे

190

आशाताई बच्छाव

1001623000.jpg

मोकाट सांड/वळू च्या पायातील खिळा काढणे म्हणजे ,वाघाच्या गळ्यात घंटा बांधण्यासारखे होय-अक्षय लोटे मोकाट वळू ची वेदनेतून डॉ. वनवे व पशु सेवकांनी केली सुटका. – . वाशिम गोपाल तिवारी ब्युरो चीफ– कारंजा शहरातील बायपास परिसरात एक मोकाट वळू सांड हा लंगडत लंगडत वेदनांना चालत असलेला काही पशुसेवकांना दिसला. त्याच्या वेदनाचं कारण पाहिलं तर त्याच्या पायामध्ये एक भला मोठा तार खिळा घुसल्याचे लक्षात आले व तो वेदनेने चालत असल्याचे निदर्शनास आले. तेव्हा परिसरातील पशुसेवकांनी त्याला थांबवून तो खिळा काढण्याचा प्रयत्न करून पाहिला, परंतु तो वळू ताकतवान असल्याने त्या पशु सेवकांना कुठल्याच प्रकारे दाद देत नव्हता. अनेक प्रयत्न करून सुद्धा तो वळू आटोक्यात येत नव्हता. शेवटी शहरातील पशुवैद्यकीय अधिकारी श्रीमान डॉक्टर वनवे साहेब व त्यांची टीम यांना पाचारण करण्यात आली.यामध्ये पशु सेवक गोसेवक अक्षय लोटे व ईतर सेवक यांना सुद्धा बोलावण्यात आले,अनेक प्रकारे प्रयत्न करून शेवटी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या वळूला गुंगीचे इंजेक्शन मोठ्या शिताफिने देण्यात आले. अर्ध्या तासानंतर त्या वळूला थोडीशी गुंगी आली व तेवढ्यात सर्व पशु सेवकांनी त्याचे पाय बांधून मोठ्या हुशारीने वळूच्या पायातील खिळा काढला. पशुवैद्यकीय डॉ. श्री. वनवे साहेब व श्री आकाश देशमुख व त्याचे मित्र यांनी ताबडतोब इंजेक्शन ड्रेसिंग करून त्या वेदनेतून त्याची सुटका केली. हे सर्व परिश्रम पाहता अक्षय लोटे म्हणाले,”मोकाट वाळूच्या पायातील खिळा काढणे म्हणजे वाघाच्या गळ्यात घंटा बांधण्या सारखेच होय.” या सर्व प्रयत्नांमध्ये बायपास परिसरातील अनेक नागरिक व पशु सेवक यांनी सहकार्य केले यामध्ये परिसरातील केशर जांगिड, चंदूभाऊ तांदूळकर आणि इतर शेतकरी मित्रांनी खूप सहकार्य केले.या गोवंश सेवकामुळेच हे शक्य झाले, पण आपले गोवंश मोकाट सोडू नये, त्यांची देखभाल करावी असे आवाहन करण्यात आले.

Previous articleघरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळुचे वाटप
Next articleबाबा मला डॉक्टर व्हायचेय. नीट परीक्षेत कौस्तुभ गाजानन सोनुनेची उत्कृष्ट कामगिरी.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.