Home उतर महाराष्ट्र महावितरणच्या लेखी पत्रामुळे तोंडाला काळे फासणे आंदोलन स्थगित

महावितरणच्या लेखी पत्रामुळे तोंडाला काळे फासणे आंदोलन स्थगित

35
0

आशाताई बच्छाव

1001613275.jpg

महावितरणच्या लेखी पत्रामुळे तोंडाला काळे फासणे आंदोलन स्थगित
श्रीरामपूर, दिपक कदम तालुका प्रतिनिधी- तालुक्यातील व शहरातील सतत पंधरा ते वीस तास तसेच अधून मधून दोन दोन तास वीज पुरवठा खंडित होत होता त्यामुळे श्रीरामपूरातील वीज ग्राहकांच्या भावना तीव्र झाल्या आहेत त्यामुळे रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी सर्व पक्षांच्या वतीने गंभीर इशारा तिला होता की 16जुन दुपारी तीन वाजता लोकमान्य टिळक वाचनालय आझाद मैदान या ठिकाणी आमदारांच्या उपस्थितीत होणाऱ्या महावितरणच्या आढावा बैठकीसाठी महावितरणच्या कार्यकारी अभियंता अजय भंगाळे तसेच उपकार्यकारी अभियंता प्रमोद केदारे तसेच त्यांचे अन्य अधिकारी त्या महावितरण च्या आढाव्या बैठकीसाठी येणार होते त्यामुळे श्रीरामपूरातील सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते हे महावितरणच्या अधिकाऱ्यांना सततचा होणारा वीजपुरवठा खंडित का होतो याचा जाब विचारून निषेध म्हणून अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासणार होते परंतु उपकार्यकारी अभियंता प्रमोद केदारे यांनी आंदोलन करताना येथून पुढे वीजपुरवठा खंडित न होता सुरळीत वीजपुरवठा चालू राहील त्याचबरोबर यदा कदाचित वीजपुरवठा खंडित झाला तर त्याची माहिती ज्या त्या भागातील वायरमन तसेचअधिकारी ग्राहकांना देतील तसे त्यांना आदेश दिले आहे म्हणून आपले होणारे आंदोलन स्थगित करावे असे त्यांनी लेखी पत्र रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दादा त्रिभुवन मर्चंड असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये राष्ट्रीय जनसेवा पार्टीचे जिल्हाध्यक्ष तेजस गायकवाड अझर पठाण अरबाज पठाण यांना लेखी पत्र दिलत्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचे आंदोलन तुर्तस्तगीत करण्यात आले आहे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता

Previous articleदिव्यांगांची सेवा हीच खरी जनसेवा व ईश्वर सेवा
Next articleश्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालेले पि.आय.श्री.अरुण धनवडे साहेब यांचा सत्कार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here