
आशाताई बच्छाव
जाफराबाद सावरखेडा येथील ईसमावर खूनी हल्ला उपचारा दरम्यान मृत्यू दोन आरोपी अटकेत
जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
जाफराबाद पोलीस स्टेशन येथे फिर्यादी नामे दीपक बाबुराव सोनुने वय 35 वर्षे व्यवसाय शेती राहणार सावरखेडा यांनी पोलीस स्टेशन जाफराबाद येथे फिर्याद दिली की त्यांच्या घराच्या पाठीमागे सुखदेव सोनुने यांची बांधकामाची वाळू पडलेली होती त्यामुळे येण्या जाण्यास होणाऱ्या त्रासाबाबत फिर्यादीची आई नामे लिलाबाई वय 58 वर्षे ही राजू सोनुने यास सांगण्यात गेली असता तिला राजू सुखदेव सोनुने व विजू सुखदेव सोनुने यांनी शिवीगाळ केली म्हणून फिर्यादी दीपक सोनवणे याची आई लिलाबाई व भाऊ सुधाकर सोनवणे व परमेश्वर सोनुने असे पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आले त्याचवेळी यातील आरोपी राजू सोनुने हा पोलीस स्टेशनला आला व फिर्यादीची आई व भाऊ बाहेर थांबले असताना त्यांना शिवीगाळ करू लागला यावरून वाद झाल्याने दोन्ही पार्ट्यांना पोलिसांनी गेटच्या बाहेर काढली गेटच्या बाहेर रोडवर आरोपी नामे-राजीव सुखदेव सोनुने व विजू सुखदेव सोनुने यांनी फिर्यादी व त्यांचा भाऊ परमेश्वर बाबुराव सोनुने व सुधाकर बाबुराव सोनुने यांच्यावर जीव घेणा हमला केला व विजय सोनुने यांनी जीवे मारण्याचा उद्देशाने फिर्यादीचे भाऊ परमेश्वर सोनवणे याच्या डोक्या च्या मागील बाजूस वीट मारून जखमी केले पोलिसांनी तात्काळ आरोपींना ताब्यात घेतले व जखमीला उपचारासाठी जाफराबाद ग्रामीण रुग्णालय जाफराबाद येथे पाठवले त्यानंतर त्यास पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय जालना येथे पाठवले त्या ठिकाणी उपचार चालू असताना जखमी इसम मयत झालेला असून त्याबाबत पोलीस स्टेशनला गुरन. 194/2025 कलम 109,115,352,351(2)(3), 3 (5) बीएनएस प्रमाणे दाखल झाले असलेल्या गुन्ह्यात कलम 103 भारतीय न्याय संहिता प्रमाणे कलम वाढ करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी नामे 1) राजू सुखदेव सोनुने व 2)विजय सुखदेव सोनवणे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जाफराबाद पोलीस करीत आहेत.