आशाताई बच्छाव
म्हसरूळ येथे घर आंगन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने वृक्षारोपण
ज्येष्ठ व्यक्तींचा संस्थेच्या वतीने वाढदिवस साजरा
दैनिक युवा मराठा
निफाड (नाशिक) प्रतिनिधी रामभाऊ आवारे
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या उक्तीप्रमाणे ‘वृक्ष लावा मोक्ष मिळवा’ हा पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उपयुक्त संदेश घेऊन म्हसरूळ (नाशिक) येथे घर अंगण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
झाड़ म्हणजे स्वास्थ्य आणि श्वास आहे. मानवाने त्याची निगा राखणे अत्यंत गरजेचे आहे यावर चर्चा करण्यात आली. त्याच बरोबर नेशनल डे म्हणून संस्थेच्या ज्येष्ठ नागरिक संघातील लोकाचा बर्थडे साजरा करण्यात आला. ज्येष्ठांना घरात किती महत्वाचे स्थान आहे हे पटवून सांगण्याचा प्रयत्न केला. संस्था काय कार्य करते, काय काम केले पाहिजे याचे विशेष महत्त्व मांडण्यात आले.यावेळी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा आशा भोईर यांनी वृक्ष म्हणजे स्वास्थ्य आहे आणि आपल्या घरातील वृद्ध म्हणजे आधार स्तंभ आहे यावर विशेष मार्गदर्शन केली. संस्थेच्या आधार स्तंभ म्हणजे सचिव अनिता पाटील यानी झाडाबद्दल सुंदर माहिती दिली.निसर्गाचे जतन व संवर्धन करणे, झाड़ाची निगा राखणे अत्यंत आवश्यक आहे हे पटवून दिले .संस्था बद्दलची आस्था जिव्हlळl जीवंत पणा काय असतो याची जाणीव त्या नेहमीच करुन देत असतात.अमोल कदम यानी घर आंगन हे नाव संस्थेला किती साजेसं आहे हे त्यानी संस्थेच्या नावाचं आणि कामाच कौतुक केल आणि कार्य बघुन मोलाचं मार्गदर्शन करुन सहकार्य करण्याचे ही आश्वासन दिले. सुरेश लाढे सरानी मोलाची मदती साठी तयारी दर्शवली. उपाध्यक्ष सुशील कुमार ठेंगे यांंनी संस्थांचे मनोबल कसे वाढेल ? लोकाच्या समस्या संस्थेच्या वतीने कश्या प्रकारे सोड़वता येतील याची जबाबदारी खांदयावर घेतली. संस्थेचे व्यवस्थापक अशोक बोरसे व उषा सूर्यवंशी यानी संपूर्ण नियोजनात झाड़ उपलब्ध करुन देण्याचा सहकार्य केले. खजिनदार पूनम भोईर ,सदस्या सगुना लहामटे यानी कार्यक्रमाचे नियोजन केले. महत्वाचे म्हणजे संस्थेच्या एम्बेसिटर कराटे, कबड्डी चैंपियन रूपाली पवार यानी महिलांनी सक्षम बनणे आणि मुलींनी स्व:ताला कस सुरक्षित ठेवता येईल याची सुंदर माहिती दिली अशा प्रकारे संस्थेच्या
ज्येष्ठ नागरिक संघातील लोकाचा वाढ़दिवस साजरा करुन कार्यक्रम ची सांगता केली.






