आशाताई बच्छाव
बलावं बलावं भाऊबंदले वं माय…. “उध्दव राज ठाकरे एकत्र येणार?
(राजेंद्र पाटील राऊत)
मालेगाव:– गेल्या काही दिवसांपासून राजकारणात वेगवेगळे फेरबदल होतांनाच्या घडामोडी बघावयास मिळत आहेत.
ज्या महाराष्ट्रात मराठी माणसांच्या हक्कासाठी एकत्रितपणे लढलेले दोघे भाऊ अर्थातच उध्वस्त व राज ठाकरे कालांतराने वेगवेगळे झाले,त्याचा फटका महाराष्ट्रात बसल्याचे दिसून आले.आता मात्र दोघे ठाकरे बंधू एकत्र येऊन शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लढविणार असल्याचे चित्र सध्या तरी संपूर्ण महाराष्ट्र अनुभवतो आहे.येणा-या आगामी काळात लवकरच शिवसेना ठाकरे गट व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची महाराष्ट्राच्या हितासाठी युती होण्याची दाट शक्यता आहे.मात्र यावेळी गाजलेले अहिराणी गाणे प्रकर्षाने यानिमित्ताने सगळयांनाच आठवत आहे.”बलावं बलावं भाऊबंदले वं माय”