आशाताई बच्छाव
कृषी संकल्प अभियानांतर्गत कृषि विभागाकडून खरीप हंगाम नियोजन व मार्गदर्शन कार्यक्रम म्हसरूळ येथे संपन्न
जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
जाफराबाद तालुक्यातील म्हसरूळ येथे शासनाकडून राबवल्या जात असलेल्या विकसित कृषी संकल्प अभियान व खरीप हंगाम नियोजन 2025 साठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी म्हसरूळ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अमोल शिंदे सर तालुका कृषी अधिकारी जाफराबाद, धांडगे साहेब k.v.k बदनापूर, राहुल कदम k.v.k. बदनापूर, काटकर साहेब मंडळ कृषी अधिकारी जाफराबाद, जगताप साहेब सहाय्यक कृषी अधिकारी माहोरा ,शरद सहाने सहाय्यक कृषी अधिकारी म्हसरूळ ,मनोज राठोड सहायक कृषी अधिकारी येवता, संतोष गायकवाड सहाय्यक कृषी अधिकारी पिंपळगाव कड उपस्थीत होते. या सर्वांचे सरपंच मंगेश लहाने यांच्या हस्ते शाल देऊन स्वागत करण्यात आले.त्यानंतर या अधिकाऱ्याकडून शेती नियोजन कसे करावे यासाठी मार्गदर्शनाला सुरुवात झाली. सर्वप्रथम त्यांनी शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून घेतले पाहिजे त्यामूळे आपल्याला खतांच्या मात्रा व्यवस्थित वापर करता येतो.त्यामुळे उत्पन्नात वाढ होते. तसेच बियाणे चांगल्या प्रतीचे वापरावे, बीजं प्रक्रिया केलेलेच बियाणे पेरणी साठी वापरावे. सोयाबीन सारखे घरचे बियाणे असल्यास त्यांनी उगवणशक्ती (Jarmanetion) तपासून पेरणी साठी वापरावे. पेरणीसाठी योग्य पध्दत कशी असते यावर सुध्छा मार्गदर्शन केले. पिकांची फवारणी करतांना एकच औषधी सतत न वापरता प्रत्येक फवारणीचा औषधी बदलून फवारणी घ्यावी असे सुचविले. त्यांनी काही शेतकरी यांचा शेतात जाऊन मिर्ची लागवडीची पाहणी केली असता मिर्ची सारख्या पिकांवरील व्हायरस नियंत्रणात कसा येईल याची माहिती सुध्दा अधिकाऱ्यांनी दिली. तसेच शेतीविषयी विवीध विषयांवर अधिकारी वर्ग यांनी शेतकऱ्याशी चर्चा केली.यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेले म्हसरूळ येथील सरपंच मंगेश लहाने, ज्ञानेश्वर शेजुळ, पोटे सर, सोमनाथ चौधरी तसेच म्हसरूळ येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.