Home जालना त्या’ भ्रष्टाचारी स्वच्छता निरीक्षकांना पुन्हा जालना मनपात घेऊ नका विद्रोही पँथर गरीबांच्या...

त्या’ भ्रष्टाचारी स्वच्छता निरीक्षकांना पुन्हा जालना मनपात घेऊ नका विद्रोही पँथर गरीबांच्या संघटनेचे प्रेम जाधव यांची मागणी

132

आशाताई बच्छाव

1001564144.jpg

‘त्या’ भ्रष्टाचारी स्वच्छता निरीक्षकांना पुन्हा जालना मनपात घेऊ नका
विद्रोही पँथर गरीबांच्या संघटनेचे प्रेम जाधव यांची मागणी
जालना । प्रतिनिधी दिलीप बोंडे – जालना नगर परिषदेची शहर महानगर पालिका झाली आहे. जालना शहरात कुठेही स्वच्छता विषयी कामे झाली नसून यास भ्रष्टाचारी स्वच्छता प्रमुख व स्वच्छता निरीक्षक जबाबदार असून जालना मनपातून बदली होऊन गेलेले पंडीत पवार, अशोक लोंढे, विलास गावंडे यांना पुन्हा जालना शहर महानगर पालिकेत घेऊ नये अशी मागणी विद्रोही पँथर गरीबांची संघटनेचे संस्थापक अध्यक्ष एस. प्रेमभाई जाधव यांनी नगर विकास विभागाचे प्रधान सचिवांकडे जालना जिल्हाधिकार्‍यांमार्फत केली आहे.
यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जालना नगर परिषदेवरून महानगरपालिका झाली असून यामध्ये जालना शहराचा कुठलाच स्वच्छता विषयी विकास झाला नसून याला कारणीभूत भ्रष्टाचारी स्वच्छता प्रमुख व स्वच्छता निरीक्षक पंडित सखाराम पवार व अशोक किशनराव लोंढे स्वच्छता, विलास उत्तमराव गावंडे निरीक्षक श्रेणी – क हे तीन जण गेल्या 15 ते 20 वर्षापासून जालना नगरपालिकेमध्ये स्वच्छता निरीक्षकाचे काम बघत आहे. यांनी यांच्या कामामध्ये लाखो-करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला असून स्वच्छतेकडे लक्ष न देता हे स्वच्छता निरीक्षक शहरातील अनाधिकृत बांधकामाकडे लक्ष देवून त्या बांधकाम धारकांकडून त्यांनी लाखो रुपये उकळले असल्याचा गंभीर आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे.
जालना येथील स्वच्छते विषयी यांनी कुठलिच स्वच्छता केली नसून संपूर्ण जालना शहर हे घाणीचे साम्राज्य झाले आहे. अशा भ्रष्टाचारी स्वच्छता निरीक्षकांना पुन्हा जालना महानगर पालिकेमध्ये घेण्यात येवू नये. त्यांना जालना महापालिकेत पुन्हा रूजू केल्यास विद्रोही पँथर गरीबांची संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Previous articleस्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांना भाजपा जालना महानगर तर्फे विनम्र अभिवादन
Next articleस्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जास्तीत जास्त समता परिषदेच्या सैनिकांना निवडून द्या – ऍड. सुभाष राऊत
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.