Home पुणे अजित पवारांचे पुण्यात दोन कारभारी; रुपाली ठोंबरेंवर मोठी जबाबदारी

अजित पवारांचे पुण्यात दोन कारभारी; रुपाली ठोंबरेंवर मोठी जबाबदारी

29
0

आशाताई बच्छाव

1001557529.jpg

अजित पवारांचे पुण्यात दोन कारभारी; रुपाली ठोंबरेंवर मोठी जबाबदारी
पुणे:ब्युरो चिप उमेश पाटील
दीपक मानकर यांनी दिलेल्या राजीनामा दिल्यानंतर आता त्यांच्या जागी पक्षातील दोन नेत्यांना संधी दिली आहे.आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्याकडून पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. नवीन शहराध्यक्षाची घोषणा करण्यात आली असून दीपक मानकर यांनी राजीनामा दिल्यानंतर आता त्यांच्या जागी पक्षातील दोन नेत्यांना संधी दिली आहे. आमदार सुनील टिंगरे आणि सुभाष जगताप राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नवीन शहराध्यक्ष असणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आता पुणे शहराला दोन शहराध्यक्ष निवडले आहेत. माजी आमदार सुनील टिंगरे यांच्याकडे पूर्व पुणे शहराची जबाबदारी देण्यात आली आहे. तर सुभाष जगताप यांच्याकडे शहराच्या पश्चिम विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
वडगाव शेरीचे माजी आमदार टिंगरे यांची पूर्वी पुण्याच्या शहाराध्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे कसबा, पुणे कॅन्टोमेंट, हडपसर आणि वडगाव शेरी या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे.
तर माजी सभागृहनेते सुभाष जगताप यांना पश्चिम पुण्याच्या शहराध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्याकडे खडकवासला, शिवाजीनगर, कोथरुड आणि पर्वती या चार विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आलीय.

Previous articleॐ नम: शिवाय’ या मंत्रात सर्व प्रकारचे दुःख नष्ट करण्याची शक्ती
Next articleविरदेल येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here