Home जालना आशासेविका सुरेखा आचलखांब यांना हिरकणी पुरस्कार प्रदान

आशासेविका सुरेखा आचलखांब यांना हिरकणी पुरस्कार प्रदान

105

आशाताई बच्छाव

1001542965.jpg

आशासेविका सुरेखा आचलखांब यांना हिरकणी पुरस्कार प्रदान
जालना/प्रतिनिधी दिलीप बोंडे – जालना तालुक्यातील नंदापूर येथे कार्यरत असलेल्या आशासेविका सुरेखा आचलखांब (वाकोडे) यांना सोमवार ता.26 रोजी हिरकणी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जालना शहरातील जालना शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात दि. 26 मे 2025 रोजी उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने महिला सक्षमीकरण अभियान अंतर्गत हिरकणी महोत्सव आयोजित केला होता. नंदापूर येथे सुरेखा आचलखांब (वाकोडे) या आशासेविका म्हणून कार्यरत असून आशा सेविकेच्या माध्यमातून गरोदर मातासाठी शासनाच्या असलेल्या विविध योजना गावात राबवित आहे. अशाच प्रकारच्या संकटात सापडलेल्या एका गरोदर मातेची अपरात्री सुखरूप प्रसुती करून आई व बाळाला शासकिय रूग्णालयात  पोहचविले होते. त्याचीच दखल घेत उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आशासेविका सुरेखा आचलखांब (वाकोडे) यांना हिरकणी पुरस्कार जाहीर केला होता. त्या पुरस्काराचा  वितरण सोहळा सोमवार ता.26 रोजी जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक सिध्दार्थ माने, शाहीर अप्पासाहेब उगले, छत्रपती शिवाजी महाराज विद्यापिठाचे प्रा. बापूराव बनसोडे, संस्थेच्या अध्यक्षा सौ. करुणा अच्युत मोरे यांच्या उपस्थितीत शाल, मानपत्र, ट्रॉफ ी देऊन हिरकणी पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याने आशासेविका सुरेखा आचलखांब यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.