Home जालना पशुसंवर्धन मंत्र्यांच्या उपस्थितीत गौशाळा संचालकांचा मेळावा घेणार : जिल्हाध्यक्ष भास्करराव दानवे

पशुसंवर्धन मंत्र्यांच्या उपस्थितीत गौशाळा संचालकांचा मेळावा घेणार : जिल्हाध्यक्ष भास्करराव दानवे

65

आशाताई बच्छाव

1001542943.jpg

पशुसंवर्धन मंत्र्यांच्या उपस्थितीत गौशाळा संचालकांचा मेळावा घेणार : जिल्हाध्यक्ष भास्करराव दानवे

जालना (प्रतिनिधी दिलीप बोंडे) : गाईंचे पालन-पोषण, संवर्धनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने कल्याणकारी योजना राबविल्या असून गौपालकांच्या अडचणी, समस्या सोडविण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री तथा पालकमंत्री ना. पंकजाताई मुंढे यांच्या उपस्थितीत गौशाळा संचालकांचा मेळावा घेणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष भास्करराव पाटील दानवे यांनी दिली.

श्री गोरक्षण पांजरापोळ गोशाळेत   गौशाळा महासंघाचे संयोजक डॉ.सुनील सुर्यवंशी यांच्या हस्ते भास्करराव पाटील दानवे यांचा सत्कार करण्यात आला.अध्यक्षस्थानी पांजरापोळ गोशाळेचे अध्यक्ष घनश्यामदास गोयल हे होते.पांजरापोळ गोशाळेचे सचिव कैलास बियाणी, कोषाध्यक्ष विजय कामड, विश्वस्त महेंद्र भक्कड,विजय राठी, संजय लाहोटी, यांची प्रमुख उपस्थिती होती.
भास्करराव पाटील दानवे यांनी जालन्यात उद्योजक, व्यापारी बांधवांकडून सेवा भावनेने गाईंची सेवा केली जाते असे नमूद करत पांजरापोळ गोशाळेस आपले सहकार्य राहील अशी हमी दानवे यांनी दिली.

घनश्यामदास गोयल यांनी अध्यक्षीय समारोप केला.  सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन कोषाध्यक्ष विजय कामड यांनी केले. कार्यशाळेत विलास तांगडे, उद्धव घुमरे, बन्सीधर आटोळे,  गंगाधर सुरवसे, हरिश्चंद्र सूकोसे,गजानन घोडके, विवेक गाढे,  विश्वनाथ घोडके, विष्णूकुमार चेचाणी, विजय बोडले,  श्रीराम राठोड, भागवत डोंगरे,  किसन बरडे, विष्णू आनंदे,  भगवान उगले, भरत भांदरगे, रवींद्र मदने, आरगडे यांच्या सह  गौशाळा संचालकांची उपस्थिती होती.
________