Home नांदेड परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती ; अर्ज करण्यास 6 जून पर्यंत मुदतवाढ.

परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती ; अर्ज करण्यास 6 जून पर्यंत मुदतवाढ.

36
0

आशाताई बच्छाव

1001508332.jpg

परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती ; अर्ज करण्यास 6 जून पर्यंत मुदतवाढ.

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

नांदेड : इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्यावतीने राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सन 2025-26 साठी मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता अर्ज करण्यास 6 जून 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

या योजनेत 75 विद्यार्थ्यांकरिता 9 एप्रिल रोजी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याची मुदत 17 मे 2025 पर्यंत देण्यात आली होती. परंतू आता 20 दिवसाची म्हणजे 6 जून 2025 पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

Previous articleप्रतिकूल परिस्थितीवर मात करत उंद्री प.दे.ता. मुखेड येथील श्रीकांत राठोडचे मिळवले दहावी परीक्षेत मोठे यश.  
Next articleशिर्डी/ लूटमार करणाऱ्या तोतया पोलिसाला ! शिर्डी पोलिसांनी ठोकल्या बेड्या.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here