Home जालना तथागत भगवान बुद्ध यांच्या विचारांची समाजाला गरज – कैलास गोरंटयाल

तथागत भगवान बुद्ध यांच्या विचारांची समाजाला गरज – कैलास गोरंटयाल

105

आशाताई बच्छाव

1001501986.jpg

तथागत भगवान बुद्ध यांच्या विचारांची समाजाला गरज – कैलास गोरंटयाल
—————————————-जालना(प्रतिनीधी दिलीप बोंडे ब्युरो चीफ) शांतता प्रस्थापित करण्यासाठी विश्वाला ‌शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे विचार प्रेरणादायी असून त्यांच्या या मार्गदर्शक विचारांची समाजाला खऱ्या अर्थाने गरज आहे असे प्रतिपादन माजी आमदार कैलास गोरंटयाल यांनी येथे बोलतांना केले.
जालना शहरातील अजंता बुद्धविहार,आनंदनगर आणि आदर्श नगर यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत भगवान बुध्द‌ यांच्या २५६९ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात गोरंटयाल बोलत होते.यावेळी प्रमुख ‌मार्गदर्शक व अध्यक्ष अशोक नावकर,सदानंद टवले, शिवप्रकाश चीतळकर,संजय पाखरे,राहुल पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी पुढे बोलतांना माजी आमदार कैलास गोरंटयाल म्हणाले की,तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे शांतीचे विचार विश्वाने स्वीकारले आहे.भगवान बुध्दांच्या विचारात मोठी ताकत असून त्यांचे शांतीचे विचारच जगाला तारू शकतात असा विश्वास देखील गोरंटयाल यांनी यावेळी व्यक्त केला.कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुणे गोरंटयाल यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्र संचालन ‌ सदानंद टवले यांनी केले.पौर्णिमा बौध्द धम्म महिला महासंघ,जेष्ठ नागरिक,बाल बालीका जयंती उत्सव समितीचे सचिव रवि शिंदे,अर्जून जाधव‌ राजे, अशोकराव पंडित, अक्षय निवारण, सागर कदम,सुंदर साळवे,‌के.टी. हिवाळे,संजय  वेव्हल, सोनाजी नावकर, भुजंगराव ‌भिसे, हिम्मतराव मस्के,‌भिमराव पांडव, संजय‌‌ खरात,‌परिसरातील उपासक‌ हजर होते..‌कार्यक्रमा नंतर  भोजन दान‌ करण्यात‌ आले.शेवटी आभार‌ माधुरी‌‌ वेव्हल मोरे‌ यांनी मानले.

Previous articleआज जालन्यात शिवकालीन ऐतिहासिक वस्तू आणि शस्त्रांचे प्रदर्शन
Next articleआदर्श विद्या मंदिर शाळेचा ८७.३६% निकाल     
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.