आशाताई बच्छाव
एमआयडीसी परिसरात स्थानिक गुन्हे शाखेचा जुगार अड्ड्यावर छापा अहिल्यानगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे
नागापूर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्डयावर छापा घालून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी १७ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून २ लाख २७ हजार ९३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी (ता. ११) दुपारी करण्यात आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण प्रभाकर पाटील (रा. भिंगार), अविनाश माणिकराव भोसले (रा. पाथर्डी), एकनाथ केरू कोतकर (रा. इसळक), प्रदीप भाऊसाहेब कोहोक (रा. दौलावडगाव), महेंद्र शिवराय कदम (रा. नवनागापूर), रवींद्र रावसाहेब साळवे (रा. निंबळक), अनिल चंदू मके (रा. निंबळक), विशाल भाऊसाहेब पाटोळे (रा. नागापूर), नीलेश भालचंद्र भाकरे (रा.नागापूर) असे ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. एमआयडीसी परिसरातील एका हॉटेलच्या बाजूला मोकळ्या जागेत जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने छापा घालून जुगार खेळताना पकडले.