आशाताई बच्छाव
सुपर आठचा कालपासून धमाका सुरू अहिल्यानगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे
जगदंब चषक क्रिकेट स्पर्धा : मंगळवारी अंतिम लढत
सोनई, ता. ३ जगदंबादेवी यात्रेनिमित्त सोनई येथील मुळा साखर कारखान्यावर सुरु असलेल्या जगदंब चषक क्रिकेट स्पर्धेत सुपर आठची धूम सुरू झाली आहे. शनिवारी (ता.३) दुपारपर्यंत खेडले येथील परमानंद इलेव्हन, घोडेगाव येथील घोडेश्वरी, चांदे येथील सावता इलेव्हन व सोनई येथील सावता गॅस व जगदंब इलेव्हन, अशा सहा संघाचा प्रवेश निश्चित झाला आहे.
यात्रा कमेटीचे अध्यक्ष माजी सभापती सुनील गडाख यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाल्यानंतर साखळी स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेचे मार्गदर्शक उदय पालवे यांनी भेट दिलेल्या मान्यवरांचा सत्कार केला. जगदंव मित्र मंडळ, उदयन गडाख युवा मंच व गुडमॉर्निंग मित्र मंडळाचे सदस्य स्पर्धा यशस्वी होण्यारराठी परिश्रम घेत आहेत. आज सायंकाळी सोनई येथील जगदेव इलेव्हन विरुध्द पाचेगाव येथील साईकॉन संघात झालेल्या रंगतदार सामन्यात जगदेव संघ विजेता ठरला.
दोन दिवसांत क्षितिज सोनवणे व रोहित धुमाळ या खेळाडूंनी अर्धशतक झळकावले आहे. कडक ऊन असताना
शहरटाकळी (ता. शेवगाव) येथील क्रिकेट रसिक विशाल शेळके यांनी जगदंच संघातील फलंदाजांना प्रत्येक चौकार व घटकार करीता मैदानात जाऊन एकूण पाच हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले.
परिसरातील क्रिकेट चाहत्यांची लक्षणीय गदों होत आहे. पंच म्हणून दिलोप
सातपुते व अझम सय्यद काम पाहत आहेत. शेरखान पठाण यांचे अभ्यासपूर्ण
समालोचन चाहत्यांना खिळवून ठेवत आहे. उद्या रविवारी (ता.४) सुपर आठमधील लबतीला सुरुवात होऊन सोमवारी उपांत्य लढतीचे चार संघ निश्चित होऊन मंगळवारी अंतिम लबत व बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.
सेव्हन एसच्या माध्यमातून क्रिकेट सामने लाइव्ह दाखविण्यात येत असल्याने आयोजकांचे कौतुक होत आहे.