Home बुलढाणा देऊळगाव राजा तहसीलचे रेतीत हात काळे ! – एक गाडी सोडण्यासाठी पथक...

देऊळगाव राजा तहसीलचे रेतीत हात काळे ! – एक गाडी सोडण्यासाठी पथक घेते 2 हजार, संतोष भूतेकर यांचा आरोप!

138

आशाताई बच्छाव

1001474236.jpg

देऊळगाव राजा तहसीलचे रेतीत हात काळे ! – एक गाडी सोडण्यासाठी पथक घेते 2 हजार, संतोष भूतेकर यांचा आरोप!
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- चिखली संत चोखामेळा धरणाअंतर्गत खडकपूर्णा प्रकल्पातून बोटीद्वारे होणाऱ्या अवैध रेती उपसा विरोधात असंतोष कायम आहे. चिखली तहसील कर्तव्य बजावत असले तरी देऊळगाव राजा तहसील मात्र रेतीत हात काळे करीत असल्याचा आरोप होत आहे. या अवैध रेती उपसा प्रकरणी युवा सेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांनी प्रशासनाला जागृत करण्यासाठी वेगवेगळे आंदोलने केली आहे. मात्र प्रशासन ढिम्म आहे. 21 एप्रिल 2025 रोजी संतोष भुतेकर यांनी जलसमाधी आंदोलनाची भूमिका घेतली होती. हे आंदोलन रोखण्यासाठी देऊळगाव राजा तहसीलला बैठक झाली. मात्र या बैठकीतून रेतीवर कायमस्वरूपी अंकुश लागलेला नाही. इसरूळ मार्गे होणारी अवैध रेती वाहतूक रोखण्यासाठी मंडपगाव, गारवा धाब्या जवळ कायमस्वरूपी चिखली महसुलचे पथक तैनात केले आहे. चिखलीच्या पथकाकडून व्यवस्थित कामगिरी सुरू सुद्धा आहे. इसरूळ मार्गे सध्या तरी 99% गाड्या बंदच आहेत परंतु एवढे करून रेती उपसा थांबला नाही. देऊळगाव राजा तहसील हद्दीमध्ये अनेक ठिकाणी अजूनही जोमात रेती उपसा चालू आहे. धरण फाट्याजवळ कायमस्वरूपी देऊळगाव राजा तहसीलचे पथक तैनात असताना दहा-दहा गाड्या रेती घेवून चिखलीकडे हायवे वरून सुसार धावतात. 4 मे 2025 रोजी सायंकाळी तब्बल 40 -42 गाड्यांचा रेतीने भरलेला ताफा देऊळगाव मही कडून चिखलीला जाताना अनेक प्रत्यक्षदर्शीनी डोळ्यांनी पाहिला आहे. मग देऊळगाव राजाचे पथक नेमके करते काय? यासंबंधी संतोष भुतेकर यांनी खळबळ जनक आरोप करत देऊळगाव राजा महसूल प्रशासनावर तोफ डागली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार देऊळगाव राजा पथक प्रत्येक गाडीचे दोन हजार रुपये घेऊन गाड्या सोडत असते. सदर वाहतुकीमुळे सध्या तरी इमानदारीने काम करणाऱ्या चिखली महसूल ची विनाकारण बदनामी होत आहे.

Previous articleअपघात ! दुचाकी मारुती सुझुकीला भिडली ! – दोन मुले जखमी
Next articleअतनुर ता. जळकोट येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.