Home जालना पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष आणि धर्मादाय...

पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे लोकार्पण

80

आशाताई बच्छाव

1001468569.jpg

 

 

 

पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष

आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे लोकार्पण

 

जालना, जिमाका, दि.1 : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आज जालना जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे लोकार्पण राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसवंर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आमदार अर्जूनराव खोतकर, अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, सरिता सुत्रावे, मनिषा दांडगे, जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांची उपस्थिती होती

पालकमंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की, राज्यातील गरजू रूग्णांना उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून आर्थिक मदत पुरवली जाते. वैद्यकीय उपचासाठी मदत मिळावी याकरिता गरजू रूग्ण व त्यांचे नातेवाईक मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे मोठ्या प्रमाणात अर्ज करत असतात. अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी ते मंत्रालयात वारंवार येतात. रूग्ण व नातेवाईकांना होणारा त्रास लक्षात घेवून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दुरदृष्टीतून रूग्ण व नातेवाईकांची परवड थांबविण्याच्या उद्देशातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्यासंदर्भात 22 फेब्रुवारी 2025 रोजी शासन निर्णय काढण्यात आला.

Previous articleअंबादासराव हरिभाऊ रत्नपारखे यांचे निधन
Next articleखरीप हंगामाची पेरणी सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना बियाणे, खते व पीक कर्ज, उपलब्ध करुन द्या         – पालकमंत्री पंकजा मुंडे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.