Home जालना पिंपळगांव रेणुकाई येथे लाईट शॉट सर्किट होऊन शेतकऱ्याचे मका पीक जळून राख

पिंपळगांव रेणुकाई येथे लाईट शॉट सर्किट होऊन शेतकऱ्याचे मका पीक जळून राख

106

आशाताई बच्छाव

1001468501.jpg

पिंपळगांव रेणुकाई येथे लाईट शॉट सर्किट होऊन शेतकऱ्याचे मका पीक जळून राख

जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके

सविस्तर वृत्त असे की पिंपळगांव रेणुकाई येथे प्राथमिक माहिती नुसार शेतकरी संदीप रंगनाथ लोखंडे यांचे शेतातून पोल वरून इलेक्ट्रिक वायर मधून लाईट गेलेली आहे. या इलेक्ट्रिक तार खूप लोंबकाळलेल्या आहे. त्यामूळे शॉट सर्किट होऊन शेतकऱ्याचे मका पिक संपूर्ण जळून गेलेले आहे.
आग लागल्या नंतर आजू बाजूला असलेल्या शेकऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला परंतू आग आटोक्यात आली नाही आणि होत्याचे नव्हते झाले.
तरी शेतकरी संदीप रंगनाथ लोखंडे यांना तहसिलदार साहेबांनी पंचनामा करून अर्थिक मदत मिळून द्यावी आशी मागणी पिंपळगांव येथील शेतकरी करत आहे. हाता तोंडाशी आलेला घास गेल्या मुळे संदीप लोखंडे यांची परिस्थिती डब घाईस आलेली आहे. त्यांना लवकरात लवकर मदत मिळावी अशी त्यांची शासनाला मागणी आहे.