आशाताई बच्छाव
जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय प्रेरक – देविदास कोकाटे
श्रीरामपूर, दिपक कदम तालुका प्रतिनिधी : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग या विभागांतर्गत कार्यरत असणारे दिव्यांग कल्याण विभाग आज कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून एक मे रोजी अहिल्यानगर येथे स्वतंत्र जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय म्हणून कार्यान्वित होत आहे. दिव्यांगांच्या विशेष सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाने हे पाऊल या ठिकाणी उचललेले आहे.दिव्यांगांच्या सर्व शासकीय योजना या दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय मार्फत यापुढे कार्यान्वित असतील दिव्यांगांच्या विशेष गरजा ओळखून त्यांची पूर्तता करण्यासाठी हे कार्यालय नेहमीच सक्षम असेल असे प्रतिपादन जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी मा. देविदास कोकाटे यांनी उद्घाटन प्रसंगी केले.
आज 1 मे 2025 रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून सामाजिक न्याय भवन,सावेडी,अहिल्या नगर या ठिकाणी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरन अधिकारी कार्यालयाचे उदघाटन जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग जिल्हा समाज कल्याण अधिकारी मा.देविदास कोकाटे व मा.डॉ.अभिजित दिवटे प्रकल्प संचालक जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र विळद घाट यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमासाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरन अधिकारी मा.प्रशांत गायकवाड,वै.सा.का. व जिल्हा दिव्यांग शाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना अध्यक्ष मा.संजय साळवे,जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र प्रकल्प समन्वयक डॉ.दीपक अनाप, अपंग संजीवनी सोसायटीचे चेअरमन मा.मधुकर भावले, सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष मा.बाबासाहेब महापुरे,दिव्यांग शक्ती संस्थेचे अध्यक्ष मा.मधुकर घाडगे,मा.सचिन तरवडे सचिव नवोदय ग्रामीण नागरी विकास प्रतिष्ठान पाथर्डी,डॉ.संजय शेळके सदस्य जिल्हास्तरीय स्थानीयस्तर समिती,मा.उज्वला घोडके,कायदेविषयक सल्लागार निलेश लंके दिव्यांग प्रतिष्ठान, पारनेर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना जिल्हा दिव्यांग सक्षमीकरन अधिकारी मा.प्रशांत गायकवाड यांनी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरन कार्यालया मागील शासनाची भूमिका विषद केली. कार्यालयाचा वापर दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरन करण्यासाठी नेहमी आपल्या सर्वांचे सहकार्य घेऊन प्रगतीकडे वाटचाल करू.
याप्रसंगी अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे,सावली संघटनेचे बाबासाहेब महापुरे,दिव्यांग शक्ती संस्थेचे मधुकर घाडगे,डॉ.शंकर शेळके यांनी दिव्यांग व्यक्तीना येणाऱ्या विविध समस्या मांडल्या.कार्यक्रमात दिव्यांगसाठी विशेष पुनर्वसनात्मक कार्य केल्याबद्दल आसान दिव्यांग संघटनेचे संस्थापक संजय साळवे यांचा सत्कार जिल्हा समाज कल्याण अधिकारी मा.देविदास कोकाटे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. तसेच प्रहार दिव्यांग संघटना अहिल्यानगर या संघटनेमार्फत देखील त्यांचा सत्कार करण्यात आला.
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व त्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना संदर्भात सविस्तर माहिती डॉ.दीपक अनाप यांनी दिली.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ.अभिजित दिवटे यांनी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरन कार्यालय हि दिव्यांग व्यक्ती व त्यांच्या पालक नातेवाईक या सर्वाना प्रेरणादायक ठरणार आहे. दिव्यांग विभाग व दिव्यांग व्यक्ती संदर्भात आज चर्चा करण्यात आलेल्या सर्व समस्या व त्या वरील उपाय योजना संदर्भात शासन व प्रशासन या दोनीही पातळीवर विशेष प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन कार्यक्रमच्या उदघाटन प्रसंगी केले.याप्रसंगी पहिले जिल्हा दिव्यांग सक्षमीकरन अधिकारी प्रशांत गायकवाड यांचा सर्व दिव्यांग संघटना,दिव्यांग शाळा कर्मचारी संघटना व पतसंस्था, संस्था पदाधिकारी तर्फे सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साळवे यांनी केले तर आभार विक्रम उंडे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गिन्यानदेव जाधव,बलिद सर, कुंभाखेले,योगेश आल्हाट, भाऊसाहेब कदम,शिवानंद भांगरे, विजय आरोटे, मतिमंद विद्यालय अहमदनगर,ज्योस्ना उद्योग केंद्र कार्यशाळा, संजीवनी सोसायटीचे मूकबधिर विद्यालय सावेडी मधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.