Home उतर महाराष्ट्र प्राचार्य उत्तमराव राजळे यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान मोलाचे – अॅड विश्वासराव आठरे...

प्राचार्य उत्तमराव राजळे यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान मोलाचे – अॅड विश्वासराव आठरे पाटील

161

आशाताई बच्छाव

1001452859.jpg

प्राचार्य उत्तमराव राजळे यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान मोलाचे – अॅड विश्वासराव आठरे पाटील       अहिल्यानगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे 

कै. यशवंतराव गाडे पाटील अध्यापक विद्यालय, अहिल्यानगरचे प्राचार्य श्री. उत्तमराव राजळे यांनी शिक्षण क्षेत्रात गेली 33 वर्षे दिलेले योगदान हे अतिशय मोलाचे आहे, असे गौरवोद्गार अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सचिव अॅड. श्री. विश्वासरात आठरे पाटील यांनी त्यांच्याविषयी काढले. शिक्षण क्षेत्रात प्राचार्य राजळे यांच्यासारखे हिरे पून्हा तयार व्हावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्राचार्य श्री. उत्तमराव राजळे सर यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ व “संवाद” पुस्तक प्रकाशन कार्यक्रम शनिवार दिनांक 26/04/2025 रोजी सकाळी 11:00 वाजता संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. प्राचार्य उत्तमराव राजळे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुरेखा उत्तमराव राजळे यांचा या प्रसंगी अॅड. विश्वासराव आठरे पाटील व मान्यवरांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज, अहिल्यानगर संस्थेचे अध्यक्ष श्री. रामचंद्र दरे हे अध्यक्षस्थानी होते. श्री दरे म्हणाले की, प्राचार्य राजळे सर यांनी आपल्या शिक्षण क्षेत्रातील सेवेच्या माध्यमातून विद्यार्थी, संस्था तसेच समाजाच्या विकासात बहुमुल्य योगदान दिले आहे.

शेवगाव-पाथर्डी मतदार संघाच्या आमदार मा. मोनिकाताई राजळे याही याप्रसंगी आवर्जून उपस्थित होत्या. राजळे परिवाराध्ये प्राचार्य राजळे यांच्या रुपाने नव्या साहित्यकाराचा जन्म झाला आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. पाथर्डी तालुक्यासारख्या दुष्काळी भागातून येऊन त्यांनी शिक्षण क्षेत्रात अतिशय प्रशंसनीय काम केले आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

सत्काराला उत्तर देतांना प्राचार्य उत्तमराव राजळे म्हणाले की, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्था हेच माझे दैवत असून संस्थेने सेवा करण्याची संधी दिल्यामुळेच शिक्षण क्षेत्रामध्ये मी एवढे मोठे कार्य करु शकलो. भविष्यामधेही संस्था व समाज यांच्यासाठी योगदान देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सेवापूर्ती कार्यक्रमासाठी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या खजिनदार अॅड. दीपलक्ष्मी म्हसे मॅडम, पारनेर विधानसभा मदतार संघाचे आमदार मा. काशिनाथ दाते सर, महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर, कासार पिंपळगावच्या सरपंच सौ. मोनालीताई राजळे, राजळे सरांचे पितृतुल्य बंधु श्री. देविदास राजळे, श्री. बाबासाहेब राजळे, प्राचार्य खासेराव शितोळे, लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. तांबे सर, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य खडे सर, माजी प्राचार्य सौ, धिरडे मॅडम व ई. आर. राजळे, सचिन सोनकर, मा. नगरसेवक संभाजीराजे कदम, संजयजी शेंडगे, गणेश कवडे, अनिल बोरुडे, शाम नळकांडे, संचिन शिंदे, गणराज प्रकाशनचे श्री. गणेश भगत तसेच शिक्षण, राजकीय, धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यापक विद्यालयाच्या प्रा.सौ. काटे एम.एस. यांनी केले. प्रा.डॉ. पाटोळे यु.एम. यांनी मानपत्राचे वाचन केले. प्रा. श्री. जायगुडे एस.बी. यांनी प्राचार्य राजळे सर यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. राजळे सरांची कन्या सौ. सुप्रिया दूस (राजळे ) होने वडीलांविषयीच्या भावना व्यक्त केल्या, माजी विद्यार्थी श्री. सुनिल परभणे व व्दितीय वर्षाची विद्यार्थीनी कु. प्रांजाल जाधव यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आभार प्रा. श्रीम. दोडे आर यू. यांनी व्यक्त केले, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संजय आखाडे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. साठे ए.व्ही., प्रा.डॉ.बोल्ली एम.एस., प्रा. साबळे पी.डी., प्रा.श्रावदे जे.झेड., श्री. प्रदिप म्हस्के. श्री. बाबासाहेब ढमाले तसेच प्रथम व व्दितीय वर्षातील छात्राध्यापक यांनी विशेष मेहनत घेतली.

Previous articleशब्दगंध कडून लिहित्या हातांना बळ : शर्मिला गोसावी
Next articleश्री सागर कचरू पाटील घावटे यांना बँकिंग विषयात PHD
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.