Home बुलढाणा BREAKING! येळगाव ग्रामपंचायतीत मोठा राजकीय भूकंप; सरपंच दादा लवकर यांचा शिंदे गटात...

BREAKING! येळगाव ग्रामपंचायतीत मोठा राजकीय भूकंप; सरपंच दादा लवकर यांचा शिंदे गटात प्रवेश !

112

आशाताई बच्छाव

1001448042.jpg

BREAKING! येळगाव ग्रामपंचायतीत मोठा राजकीय भूकंप; सरपंच दादा लवकर यांचा शिंदे गटात प्रवेश !
युवा मराठा न्यूज बुलडाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :– बुलडाणा बुलढाण्यात आज राजकीय वादळ उसळले! येळगाव ग्रामपंचायतीचे सत्ताधारी सरपंच दादा लवकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. बुलढाण्यात आयोजित शिंदे यांच्या आभार दौऱ्याच्या मंचावरच त्यांनी भगवा फडकावत नवा राजकीय रंग दाखवला. फक्त दादा लवकरच नाही, तर अनेक काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही शिंदे गटाचा झेंडा हाती घेतला आहे. गावपातळीवर याचे मोठे पडसाद उमटले असून, ग्रामपंचायत व जिल्हा राजकारणाचे समीकरणे आता बदलण्याची शक्यता आहे. शिंदे गटाने पुन्हा एकदा आपल्या शक्तीचे प्रदर्शन करत विरोधकांना जबर धक्का दिला आहे.

Previous articleमोठी बातमी ! माजी आमदार दिलीपकुमार सानंदा शिवसेनेच्या वाटेवर ? आ. गायकवाड यांच्या फार्महाऊस वर एकनाथ शिंदेच्या भेटीसाठी पोहचले….
Next articleडोणगावमध्ये खुलेआम अवैध गॅस व पेट्रोल विक्री; प्रशासन गप्प !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.