आशाताई बच्छाव
भ्रष्टाचाराच्या समुळ उच्चाटनासाठी व्यापक संघटनशक्तीची गरज-वसंतराव देशमुख राष्ट्रीय उपाध्यक्ष अभाभ्रनिसंस
प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक -24/04/2025
सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत असतांना अनेक ठिकाणी भ्रष्टाचार पहावयास मिळतो परंतु भ्रष्टाचार निर्मूलन करण्यासाठी देशभरात व्यापक प्रमाणावर भ्रष्टाचार विरोधी मोहीम राबवुन जास्तीत जास्त लोकांनी भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती मध्ये सभासद नोंदणी करुन एक प्रभावशाली दबावगट निर्माण करण्याची गरज आहे.जनसामान्यांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी जे की,आज सर्वसामान्य माणसांच्या हक्कांवर गदा आली आहे ते हक्क आणि देशभरात वाढलेला कमालीचा भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी देशातील जनतेने भ्रष्टाचारविरोधी मोहीमेत जास्तीत जास्त सहभाग नोंदवुन देशातील भ्रष्ट शासन व प्रशासन यांच्या विरोधातील लढा अधिक तीव्र करण्याची गरज आहे.पुढारी जनतेच्या जिवावर मोठे झाले आणि आता जनतेच्याच जिवावर उठले आहेत याचे अनेक जिवंत उदाहरणं आज सगळीकडे पहावयास मिळत आहेत.अनेक भ्रष्टाचारी आमदार- खासदार, लोकप्रतिनिधी, अनेक भ्रष्ट प्रशासकिय अधिकारी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत परंतु कोणत्याही नेत्यांवर आणि शासनाच्या अधिकारी -कर्मचारी यांच्यावर कारवाई झालेली नाही याउलट सर्वसामान्य नागरिकांनी कोणताही गुन्हा न करता त्यांच्यावर खोट्या केसेस करुन अडकवण्याचा प्रयत्न होत आहे. मग हा सर्वसामान्य आम जनतेवर अन्याय नाही काय ? याचाहि विचार होणे गरजेचे असून यासाठी जनतेने भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या जनआंदोलनात सहभागी होऊन शासनाच्या या उरफाट्या धोरणांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.वसंतराव देशमुख यांनी केले आहे.
चोरांच्या हातात तिजोरीच्या चाव्या दिल्यानंतर चोर तिजोरी रिकामी केल्याशिवाय थांबेल का? त्याप्रमाणेचे काही अंशी सध्या देशात परिस्थिती झाल्याचं दिसून येत आहे.केवळ जनतेच्या पैशातून सत्ता मिळवायची आणि जनतेच्या डोळ्यात धूळफेक करायची हा गोरखधंदा राजरोसपणे सुरु आहे.याचाही कुठेतरी विचार होणे गरजेचे आहे.महाराष्ट्र सरकारमध्ये असे काही संवेदनाहिन मंत्री आणि आमदार आहेत की,ते राजरोसपणे खुन, हत्या, दरोडे यांचं समर्थन करत आहेत अशा बेजबाबदार व संवेदनाहीन लोकप्रतिनिधींना आपल्या पदावर राहण्याचा अधिकार नाही परंतु सरकारने अशा लोकांना बडतर्फ करण्याची गरज असतानाही त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही.या अशा जातीयवादी नेत्यांमुळे राज्यातील समाजा-समाजातील जातीवाद विकोपाला गेला आहे.अशा वाचाळ मंत्री आमदार यांना बडतर्फ केले पाहिजे.सध्या असे एकही कार्यालय नाही की,त्या ठिकाणी भ्रष्टाचार नाही सर्वच कार्यालयात टक्केवारी घेतल्याशिवाय सामान्य जनतेचे कामं होत नाहीत.राजरोसपणे अधिकारी व कर्मचारी सर्वसामान्य माणसाला पैसे मागतात अशा वेळी जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी काय करतात असा प्रश्न पडतो.जनतेने हा भ्रष्टाचार निर्मूलन करण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे आवाहन त्यांनी केले आहे.निवडणुकीपुर्वी अनेक आश्वासन दिली जातात.जनतेचाच पैसा अनाठायी वाटला जातो यामुळे जनतेच्या पैशाचा अपव्यय होतो आणि त्याचा परिणाम म्हणून राज्यांवर देशांवर कर्जाचा डोंगर उभा केला जातो.आणि यामध्ये सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे.राजकिय लोकांनी त्यांची घरं भरली आणि भुर्दंड जनतेला सोसावा लागत आहे याचाही विचार होणे गरजेचे आहे.जनतेने केवळ मुकाटपणे बघ्याची भूमिका घेऊन आपल्या पायावर धोंडा पाडून घेऊ नये.सध्याच्या राजकीय परिस्थिती व सामाजिक असमतोल आणि याला खतपाणी घालत असलेले राजकीय पक्ष या सर्व परिस्थितीचा विचार करता, येणारा काळ हा फारच भयानक असेल याचा अनुभव येत आहे.भविष्यातील हा फार मोठा धोका असेल. सध्या राजकारणाचा स्तर इतका खालावला आहे की,त्याची कल्पना करणेही शक्य नाही.राज्यासह देशाला पुर्वीचे गतवैभव प्राप्त करून द्यायचं असेल तर ती क्षमता अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांच्या कार्यात आहे यासाठी सर्वसामान्य जनतेने अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीमध्ये सामील होण्याचं आवाहन राष्ट्रिय उपाध्यक्ष मा.वसंतराव देशमुख यांनी केले आहे.