Home Breaking News आताची सगळ्यात मोठी बातमी…!! पाकिस्तानी सिमा हैदरला भारत सोडावे लागणार का?

आताची सगळ्यात मोठी बातमी…!! पाकिस्तानी सिमा हैदरला भारत सोडावे लागणार का?

180

आशाताई बच्छाव

1001439035.jpg

आताची सगळ्यात मोठी बातमी…!!
पाकिस्तानी सिमा हैदरला भारत सोडावे लागणार का?
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गेल्या काही वर्षांपूर्वी आपल्या प्रियकरासाठी नेपाळमार्गाने भारतात पोहचलेल्या पाकिस्तानी विवाहित सहा मुलांची आई असलेल्या सिमा हैदरला आता भारत सोडून जावे लागणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पब्जी गेम्सच्या माध्यमातून प्रेमात पडलेल्या विवाहित सिमा हैदरनै सगळ्या सीमा पार करून भारतात नेपाळमार्ग प्रवेश केला होता.मात्र सिमा हैदरला अजूनही भारतीय नागरिकत्व मिळालेलं नसल्यामुळे आता सिमा हैदरला पाकिस्तानात परत जावे लागणार का अशा चर्चांना उधाण आले आहे.
काश्मीरच्या पहेलगाम मध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात सुमारे सतावीस हिंदू पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने भारत सरकारने भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना भारत देश सोडण्याचा इशारा दिलेला असल्यामुळे आता पुन्हा सिमा हैदरचे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे.