आशाताई बच्छाव
हजारो शेतकऱ्यांना अमीष दाखवुन भोकरदनच्या आकांनी विहिरींच्या दलाली पोटी जमा केले करोडो रुपये – बोरशे गुरुजी
जाफराबाद जालना प्रतिनिधी- मुरलीधर डहाके
दिनांक 23/04/2025 भोकरदन तालुक्यातील
विहिरी, घरकुल, गाय गोठे, खऱ्या गरीब गरजवंतांना मिळवून देण्यासाठी आम आदमी पार्टी करणार संघर्ष. चौकशी करण्यासाठी गट विकास अधिकारी पंचायत समिती भोकरदन यांना देण्यात आले निवेदन!निवेदनात सहा मागण्या करण्यात आल्या असून सर्व योजनांच्या लाभार्थ्यांची गाव निहाय यादी मिळण्याबाबत मागणी करण्यात आलेली आहे.तसेच निवेदनाच्या प्रती वरिष्ठांना पाठवण्यात आल्या आहेत.असे बोरशे गुरुजींनी कळवीले आहे.
. याबाबत सविस्तर असे की पंचायत समिती मार्फत देण्यात येत असणाऱ्या विंधन विहिरी गाय गोठे घरकुल आणि इतर लाभाच्या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असून तालुक्यामध्ये दलालांचा सुळसुळाट झालेला आहे. आकाच्या नावाने गरीब शेतकऱ्यांची पिळवणूक करून काही म्हणतात मी विहिरीसाठी 30,000 प्रमाणे 100 विहिरीचे जमा केले. काही म्हणतात मी 50 हजार प्रमाणे दीडशे विहिरीचे जमा केले. अशी माहिती बोरशे गुरुजी यांनी दिली. या व्यवहाराची भोकरदन तालुक्यात राजरोसपणे चर्चा सुरू असून ज्यांचे पैसे अडकले ते मात्र विहिरीच्या मंजुरीसाठी चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. त्याचप्रमाणे घरकुल आणि गाय गोठ्याचे सुद्धा पैसे जमा करण्यात आले आहेत. या दलाल लोकांनी नवीन भोकरदन पॅटर्न तयार केला असून जुनेच घर दाखवा, जुनी विहीर दाखवा, गाय गोठा बांधूच नका! फक्त आम्हाला पैसे द्या कामाची मंजुरी करून घ्या अर्ध्यात तुम्ही अर्ध्यात आम्ही अशाप्रकारे गरजवंतांना डावलून अपात्र धनदांडगे, पाळलेले तितर आकाच्या आदेशाने कमाई करून घेत आहेत आणि आकालाही करोडो मिळवुन देत आहेत. तर खरे गरजवंत या लाभापासून वंचित राहत आहेत. गोदी मिडीया याबाबत चकारशब्द बोलायला किंवा छापायला तयार नाही.यासाठी आम आदमी पार्टी खऱ्या गरजवंतासाठी सतत संघर्ष करत आहे यापुढे करणार आहे. आज पर्यंत लाभ घेतलेल्या लाभधारकांची तसेच यापुढे लाभ देण्यासाठी मंजूर झालेल्या लाभधारकांच्या यादीच्या प्रमाणित सत्यप्रतिची आम आदमी पार्टीने मागणी केलेली आहे. याद्या प्राप्त होताच प्रत्येक गावात शासकीय योजनेतून केलेल्या सर्व कामांची स्थळ पाहणी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते करणार असून खोट्यांचे पितळ उघडे पडणार आहे.अशा दोषी अधिकारी व कर्मचारी लोकांना योग्य ती शिक्षा करण्यासाठी तसेच गरजवंतांना लाभ मिळवून देण्यासाठी आम आदमी पार्टीचा संघर्ष चालूच राहणार!याबाबतचे निवेदन आज पंचायत समितीचे कार्यालयीन अधीक्षक श्री जगताप साहेब यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.सर्व योजनांच्या लाभार्थ्यांची गाव निहाय यादी मिळण्याबाबत मागणी करण्यात आलेली आहे.अन्यथा आम आदमी पार्टी मार्फत भोकरदन पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन /उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आलेला आहे.यावेळी आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष जनार्दन पाटील सोळंके , शहराध्यक्ष महेजादखान तसेच नागरिक आणि आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते हजर होते.असे प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकामध्ये बोरसे गुरुजी यांनी कळविले आहे.
—– बोरसे गुरुजी
9403500477