आशाताई बच्छाव
प्राध्यापक डॉ.जलबा नरवडे यांना भीम रत्न पुरस्कार
बदनापूर/जालना, दि. २३(प्रतिनिधी दिलीप बोंडे)-मध्यप्रदेश येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर
मेमोरीयल सोसायटी महूच्या वतीने बदनापूर येथील प्राध्यापक डॉ.जलबा नरवडे
यांना मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांच्या हस्ते भीम रत्न पुरस्कार देण्यात
आला.
मध्य प्रदेश राज्यातील महू येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरीयल
सोसायटीच्या वतीने दरवर्षी विविध पुरस्कार समाजातील कर्तबगार व्यक्तीना
दिले जाते. यंदा जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील निर्मल क्रीडा व समाज
प्रबोधन ट्रस्ट संचलित बदनापूर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील
इतिहास विभागातील प्राध्यापक डॉ. नरवडे जलबा यांना भीम रत्न पुरस्कार
जाहीर करण्यात आला होता. संस्थेच्या वतीने १४ एप्रिल रोजी एका
कार्यक्रमात डॉ. नरवडे यांना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव
यांच्या हस्ते सदर पुरस्कार देण्यात आला यावेळी भन्ते धम्मदीप महाथेरो
उपस्थित होते.
डॉ. नरवडे यांना भीम रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने निर्मल
क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट अध्यक्ष डॉ. देवेश पाथ्रीकर, सचिव डॉ. एम.
डी.पाथ्रीकर, संचालक डॉ. एस. एस. शेख, डॉ.खान नाजमा आदिनी अभिनंदन केले.
००००००००००००००
फोटो ओळी….
१०- मध्यप्रदेश येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरीयल सोसायटी महूच्या
वतीने बदनापूर येथील प्राध्यापक डॉ.जलबा नरवडे यांना मुख्यमंत्री डॉ.मोहन
यादव यांच्या हस्ते भीम रत्न पुरस्कार देण्यात आला.
०००००००