आशाताई बच्छाव
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून विविध सेवा गौरव व जीवन गौरव पुरस्कारासाठी प्रस्ताव निमंत्रीत. —————————————- दैनिक युवा मराठा. ——- पी. एन . देशमुख . अमरावती जिल्हा प्रतिनिधी.
. पत्रकार आणि सामाजिक कल्याण व न्याय्य हक्कासाठी संघर्ष आणि अविरत उपक्रमाने लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ ही संघटना गेल्या ४ वर्षात महाराष्ट्रात अग्रेसर ठरलेली आहे. या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून पत्रकारीता, सर्व मिडीया क्षेत्र, साहित्य, प्रबोधन, जागृती,समाजसेवा क्षेत्र शैक्षणिक, कला, क्रिडा, सांस्कृतिक, संगीत, लोककला, कृषी,संशोधन,आपात्कालीन मदती,मार्गदर्शन,वंचित,निराधार,अपंग,रूग्ण सहकार्य सेवाव्रती,ग्रामीण विकास, पर्यावरण, आणि ईतर विविध क्षेत्रात नेत्रदिपक कार्य करणाऱ्या अग्रेसर नामवंतांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.आपले भरगच्च उपक्रमव पत्रकार चळवळीच्या संघर्षशील वाटचालीचे भेदभाव रहित वाटचाल करणारी ही संघटना आहे.महाराष्ट्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील नामवंतांसोबत प्रोत्साहनपर शक्तीचे बळ उभे करणे हा संघटनेचा संकल्प आहे.महाराष्ट्रातील प्रसिध्द तिर्थक्षेत्री किंवा निसर्गरम्य स्थळी हा पुरस्कार समारंभ राहणार आहे.यामधील प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी विविध क्षेत्रातील अग्रेसर व्यक्तीचे प्रस्ताव निमंत्रित आहेत. पत्रकार व समाज जागृती, संघटन, स्वास्थ, मन:स्वास्थ, कायदेविषयक मार्गदर्शन,मानवी जीवन मुद्द्यांच्या प्रसार ,आरोग्य शिबीरे,मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरे अशा उपक्रमांनी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची नियमित वाटचाल आहे. या सेवा कार्याला आर्थिक सहकार्य म्हणून नाममात्र नोंदणी शुल्क यासाठी ठेवण्यात आले आहे. या भव्य दिव्य पुरस्कार समारंभातील प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी ईच्छूकांनी आपल्या पिनकोडसह संपूर्ण पत्ता व संपूर्ण माहितीच्या तपशीलासह,सोबत ४ पासपोर्ट,आधार कार्ड आणि उपक्रमाचे फोटो व वृत्तपत्रातील प्रकाशित बातम्यांच्या कटींगसह दि.२० एप्रिल २०२५ पर्यंत खालील पत्त्यावर पाठवावेत. पुरस्कारासाठी निवड झाल्यानंतर पुरस्कारार्थींना निवड पत्र आणि निमंत्रण पत्रिका पाठविण्यात येईल.यामध्ये पुरस्कार मंजूर करण्याचा निवड समितीचा निर्णय अंतिम राहील. आपले प्रस्ताव..मा.श्री प्रदीप खाडे,ज्येष्ठ पत्रकार,राष्ट्रीय उपाध्यक्ष- लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ,”पितृ छाया” खेडकर नगर,अकोला (विदर्भ) ४४४००१ मोबा.क्र.९८२२२३००२५ या पत्त्यावर पाठवावेत.अधिक माहितीसाठी ९८८१३०४५४६ ८७८८६०२६३३ या क्रमांकावर संपर्क साधावा.असे आवाहन संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख व सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.






